ईटेंडरींगची मर्यादा दहा लाखापर्यंत, महाविकास आघाडी सरकारचा महत्वपुर्ण निर्णय ः शेख महेमूद

0
36
Shekh mehumud


जालना (प्रतिनिधी) ः राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, महाविकास आघाडी सरकारने ईटेंडरींग तीन लाख पर्यंत असलेली मार्यादा वाढून दहा लाखापर्यंत केल्यामुळे मजुर सहकारी संस्था व सुक्ष्म कंत्राटदार आणि अन्य बेरोजगार संस्थांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भाजप सरकारच्या काळात या संस्थांवर बेरोजगाराची कुर्‍हाड पडली होती. या सरकारच्या निर्णयामुळे छोटी विकास कामे तात्काळ होऊन विकासाला देखील गती मिळणार असल्याचे जालना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी सांगीतले आहे.
भाजप सरकारने तीन लाखापर्यंत ईटेंडरींगची मर्यादा ठेवल्यामुळे छोटे ठेकेदार, मजुरसंस्था आणि इतर बेरोजगार संस्था कोलमडून पडल्या होत्या. हजारो लोक बेरोजगार होवून सैरभैर झाले होते आणि तात्काळ विकासाची कामे रखडली गेली होती. याबाबतीत आमदारापासून संबंधीत संघटनांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अग्रहाची मागणी केल्यानंतरही संवेदनाहीन सरकारला कुठलाही फरक पडला नव्हता. परंतू महाविकास आघाडीचे मुख्यंमत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी राज्यातील सर्वपक्षीय आमदार आणि छोटे कंत्राटदार, मजुर सहकारी संस्थेचे पदाधिकारी यांची मागणी लक्षात घेवून हा प्रश्‍न निकाली लावत ईटेंडरींगची मर्यादा दहा लाखापर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे संंबंधीत कंत्राटदार आणि मजुर संस्था व अन्य संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानून आनंदोत्सव साजरा केला आहे.
महाविकास आघाडी सरकारचे आणि आमदार कैलास गोरंट्याल, आ. राजेश राठोड, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांचे शहर काँग्रस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत, राम सावंत, विजय चौधरी, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, कृष्णा पडूळ, अशोक उबाळे, राजेंद्र गोरे, ज्ञानेश्‍वर कदम, मोहन इंगळे, चंद्रकांत रत्नपारखे, फकीरा वाघ, राजु पवार, जॉर्ज उगले, जावेद अली, गुरूमितसिंग सेना, आनंद लोखंडे, शेख शमशू, रविकांत जगधने आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here