कै. बिबीषण हरकळ स्मृतीचषक जिल्हास्तरीय टेनिक्वाईट स्पर्धा उत्साहात संपन्न
मुलींच्या गटात निकीता पारे तर मुलांच्या गटात संतोष कोल्हापुरे प्रथम

0
7

जालना/प्रतिनीधी – जालना जिल्ह्याचे पहिले टेनिक्वाईट खेळाडु तथा राज्यस्तरीय पंच कै. बिबीषण हरकळ यांच्या पहिल्या स्मृतीदिना निमीत्त 17 वर्षाआतील मुले/मुली यांच्या एकेरी जिल्हा स्तरीय टेनिक्काईट (रिंग टेनीस) स्पर्धेचे आयोजन दिनांक 20 डिसेंबर 2021, सोमवार रोजी देवगिरी इंग्लिश स्कुल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना येथे करण्यात आले होते.

     स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी देवगिरी इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष बबन दादा सोरटी होते तर स्पर्धेचे उदघाटन जिल्हा क्रीडा कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक शेख मोहम्मद यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी नगरसेवक मिर्झा अनवर बेग, प्रेस काँन्सील ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाध्यक्ष दिपक शेळके, देवगिरी इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापीका प्रा. गायत्री सोरटी, सामाजीक कार्यकर्ते शेख गौस भाई आदिंची उपस्थिती होती.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे – एकेरी मुली प्रथम ः निकीता पारे (जिवनराव पारे विद्यालय, चंदनझीरा), द्वितीय ः दिक्षा मगरे (जि.प. प्रशाला बोरी), तृतीय ः दिपाली उघडे (देवगिरी इंग्लिश स्कुल, जालना), मनीषा भोरे (जि.प. प्रशाला बोरी), एकेरी मुले प्रथम ः संतोष कोल्हापुरे (जि.प. प्रशाला, नेर), द्वितीय ः नकुल उफाड (जि.प. प्रशाला नेर), तृतीय ः प्रतिक भद्रे (देवगिरी इंग्लिश स्कुल, जालना), पांडुरंग नाथभजन (जि.प. प्रशाला नेर), स्पर्धेत जिवनराव पारे विद्यालय चंदनझीरा, जि.प.प्रशाला नेर, जि.प. प्रा.शा. बोरी, सकलेचा इंग्लिश स्कुल जालना, जि.प.प्रा.शा. नंदापुर, माय फ्रे ड इंग्लिश स्कुल, गोलापांगरी व देवगिरी इंग्लिश स्कुलचे जवळपास 180 खेळाडु सहभागी झाले होते.
स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष नगरसेवक जयंत राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबनदादा सोरटी तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा. गायत्री सोरटी, राष्ट्रवादी कॉग्रेसचे सुनील देशमुख आदिंची उपस्थिती होती. दोन्ही कार्यक्रमाचे प्रास्तावीक व सुत्रसंचालन कार्यक्रमाचे आयोजक शेख चाँद पी.जे. यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष वाघ यांनी केले.
स्पर्धेत पंच म्हणुन राज्य पंच गोवर्धन वाहुळ, उमेशचंद्र खंदारकर, तुषार गर्जे, नितीन जाधव, संतोष वाघ, शेख समीर तर गुणलेखक म्हणुन सोहेल खान, वेदांत सोरटी, मो. रफी यांनी काम पाहीले. तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुभाष पारे, विजय सदावर्ते, उद्धव भुंमरे, अक्षय गंगावणे, साई यांनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here