छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील फेरीवाल्यांच्या टपरीमध्ये आग लागून झाला सिलेंडर स्फोट

0
7

जालना:शनिवारी, पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास शिवाजी महाराज पुतळा परिसरातील भेळपुरी विक्रेत्याच्या टपरीला अचानक आग लागली होती.आगीची माहिती कळताच रात्र गस्तीवर असलेले सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार महेश्वर सोनटक्के आणि  पोकॉं. जाधव हे जीपसह मदतीला धावले. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला फोन करून कळविले व त्यांनी आग विझविण्यासाठी सुरुवात केली. आग विझवत असतानाच टपरीत असलेल्या सिलेंडरचा अचानक मोठा विषय स्फोट झाला. या स्फोटांमध्ये पोलीस हवालदार सोनटक्के हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रारंभी जालना येथे उपचार करून नंतर औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.हा स्फोट एवढा भीषण होता की, खूप मोठा आवाज होऊन टपरीचा पूर्णता चुराडा होऊन सुट्टे भाग दूरवर सर्वत्र पसरले होते. माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, सदर बाजार पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर पायघन आदींसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत कार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here