जालना:कोव्हीड रुग्णालयाची जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांच्याकडून पहाणी

0
4

रुग्णांना उपचारामध्ये कुठलीही कमतरता भासणार नाही याची दक्षता घेण्याचे
आरोग्य प्रशासनाला दिले निर्देश
जिल्ह्यातील प्रत्येकाने लच टोचुन घेण्याबरोबरच
मास्क, सॅनिटायजर व सामाजिक अंतराचे पालन करण्याचे आवाहन
जालना – जिल्ह्यात कोव्हीड19 च्या बाधितांमध्ये वाढ होत असुन त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या कोव्हीड रुग्णालयास प्रत्यक्ष भेट देत त्या ठिकाणी असलेल्या सोयी-सुविधांची पहाणी केली. या ठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या उपचारामध्ये कुठलीही कमतरता भासणार नाही याची, दक्षता घेण्याच्या आरोग्य प्रशासनास सुचना केल्या. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने मास्क, सॅनिटायजरचा वापर तसेच सामाजिक अंतराचे कटाक्षाने पालन करण्याबरोबरच प्रत्येकाने लस टोचुन घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, जिल्ह्यात कोव्हीड बाधितांची वाढ होत असुन उपचारासाठी रुग्ण कोव्हीड रुग्णालयात दाखल होतील. दाखल झालेल्या रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत. रुग्णांच्या उपचारामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सुचना करत रुग्णालयात स्वच्छता ठेवण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी संपुर्ण कोव्हीड रुग्णालयाची पहाणी करत आयसीयु विभागात असलेले व्हेंटीलेटर, ऑक्सिजन वितरण प्रणाली, मॉनिटर आदींची पहाणी केली. सुरक्षिततेच्यादृष्टीने उभारण्यात आलेल्या स्मोक डिटेक्टर, अलार्म सिस्टीम आदी यंत्रांची प्रत्यक्ष चाचणी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी खातरजमाही यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here