जालना जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे दर्पण दिनाचे आयोजन

0
6

जालना, (प्रतिनिधी)- जालना जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे 6 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता दर्पण दिनानिमित्त ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.ओमीक्रॉन विषाणूच्या वाढत्या प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय निर्बंधाचे पालन करून दर्पण दिनाचा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात येत आहे. सर्वे नंबर 488 मधील पत्रकार भवनात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी श्री प्रमोद धोंगडे, जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अब्दुल हाफिज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या छोटेखानी कार्यक्रमास शहरातील पत्रकारांनी सामाजिक सुरक्षित अंतराचे पालन करून उपस्थित राहून सहकार्य करावे. तसेच, जिल्ह्यातील सर्व तालुका पत्रकार संघानी आपापल्या तालुक्याच्या मुख्यालयी दर्पण दिनाचा कार्यक्रम आयोजित करावा, असे आवाहन जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष फकीरा देशमुख, कार्याध्यक्ष किशोर आगळे, जिल्हा सरचिटणीस नारायण माने, उपाध्यक्ष अभयकुमार यादव, दिनेश जोशी, कोषाध्यक्ष धनसिंह सूर्यवंशी, चिटणीस शेख मुसा, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मोहन मुळे, गणेश औटी, अशोक शहा, राजकुमार भारुका, सर्जेराव गिऱ्हे, धनंजय देशमुख, संतोष सारडा आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here