जालना: पैशाच्या देवाणघेवाणीतून मित्रांनीच काढला मित्राचा काटा..!
खुनानंतर एका आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

0
3

‘एमपीडिए’ अंतर्गत स्थानबद्धतेतून 15 दिवसांपूर्वीच सूटका झालेल्या आरोपीचे कृत्य
तीनपैकी दोन आरोपींना घेतले एलसीबीने ताब्यात

जालना:शहरातील डबलजीन भागात आज सकाळी मृतावस्थेत आढळून आलेल्या भरत अशोक मुजमुले याचा खून त्याच्या तीन गुन्हेगार मित्रांनी दारूच्या नशेत पैश्याच्या देवाणघेवानीतून केल्याची बाब पुढे येत आहे.याप्रकरणी शहरातील एमपीडीएअंतर्गत एक वर्ष स्थानबद्ध असलेला व काही दिवसांपूर्वी तुरूंगातून सुटून आलेल्या ऋषी भगवान जाधव आणि आकाश लुंगे व आणखी एक अशा तीन जणांनी चाकूने वार करून हा खून केला आहे.ऋषी व आकाश या दोघांना एलसीबीने ताब्यात घेतले आहे.ताब्यात घेण्यापूर्वीच ऋषी याने विषारी औषध प्राशन केलेले होते. त्याच्यावर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.दरम्यान, मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिसात तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here