जालन्यात अखेर ओमीक्रॉनचा प्रवेश, आरोग्य यंत्रणा सतर्क

0
4

जालना – जिल्ह्यात पहिला ओमिक्रॉनचा रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
ओमिक्रॉनचा रूग्ण दुबई येथून आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी रात्री उशीरा दिली.
जिल्ह्यात कोरोना संक्रमण पुन्हा वाढू लागले आहे. शनिवारी २३ आणि रविवारी ३५ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने धोक्याची घंटा वाढली आहे.
फेब्रुवारी ते जूनदरम्यान कोरोनाची दुसरी लाट आली होती. या कालावधीत हजारो पॉझिटिव्ह रुग्णामध्ये शेकडो नागरिकांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर कोरोना संसर्गात कमी आलेली आहे. डिसेंबर महिन्यात अत्यन्त कमी कोरोनाग्रस्तांची नोंद झाली तर संक्रमितांची मृत्यू नोंद निरंक आहे. चार महिन्यांत दुहेरी आकड्यामध्ये संक्रमितांची संख्या नोंद झालेली नव्हती. आता मात्र, डिसेंबरचे शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा संक्रमण वाढायला लागले आहे. जिल्ह्यात कोरोना सक्रिय रूग्णांची संख्या १३१ झाली होती. त्यात रविवारी जिल्ह्यात ओमीक्रॉनचा पहिला रूग्ण आढळून आला आहे. हा रूग्ण ता.एक जानेवारी रोजी दुबई येथून शहरात आला होता. त्यांनतर ता.२ जानेवारी रोजी या रूग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, त्याला कोणताही त्रास नव्हता. सदर रूग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल होत असल्याचे आरोग्य यंत्रणेला सांगितले. मात्र, तो रूग्ण रूग्णालय दाखल न होता होम क्वारंटाईन झाला. दुबई येथून आल्याने व कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेने त्या रुग्णांचे नमुने ओमिक्रॉन विषाणू चाचणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल रविवारी (ता.९) प्राप्त झाला असून त्या रुग्णाला ओमीक्रॉन विषाणूची लागण झाल्याचा अहवाल आला आला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.खतगावकर यांनी सांगितले. त्यामुळे तो रुग्ण आता होम क्वारंटाईन असल्याने तो किती जणांच्या संपर्कात आला आहे, याची माहिती आरोग्य विभाग संकलित करत आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here