जालन्यात कालीचरण महाराजांच्या समर्थनार्थ आंदोलन

0
6

हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जालना/प्रतिनिधी – कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या समर्थनार्थ जालन्यातील वीर सावरकर चौकात आज मंगळवारी (ता. 11) अखिल भारत हिंदु महासभेच्यावतीने ‘माझे समर्थन’ हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका पाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. वंदे मातरम, कालीचरण महाराज की जय या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
कालीचरण महाराज यांनी छत्तीसगडच्या रायपूर येथील धर्म संसदेत हिंदू महासभेचे नेते पं.नथुराम गोडसे यांच्या भूमिकेचे समर्थन केल्याने त्यांच्याविरुद्ध छत्तीसगड सरकारने विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली, त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, सरकारच्या या मुस्कटदाबी विरुद्ध ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत, हिंदुत्ववादी रस्त्यावर उतरत आहेत. जालन्यातही त्याचे तीव्र प्रतिसाद उमटले आहेत. आज सकाळी हिंदू महासभेचे प्रदेश संघठन मंत्री धनसिंह सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हिंदू महासभेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते वीर सावरकर चौकात जमले आणि त्यांनी कालीचरण महाराज यांना समर्थन म्हणून आंदोलन केले.
प्रारंभी वीर सावरकरांच्या पुतळयावर पुष्पवर्षाव करून घोषणाबाजी करण्यात आली. तद्नंतर मनोगत व्यक्त करताना श्री. सुर्यवंशी म्हणाले की, हल्ली हिंदुत्वाबद्दल बोलणार्‍यांना सरकार लक्ष्य करून विविध कलमाद्वारे गुन्हे दाखल करून अटकेपर्यंत मजल मारत आहे, ही बाब अत्यंत घृणास्पद असून, व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणारी आहे. हिंदू महासभा कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या भूमिकेचे समर्थन करत असून, कुठल्याही कारवाईला आम्ही घाबरणारे नाहीत, कालीचरन महाराज यांच्यावरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान, आंदोलनकर्त्यांची आक्रमक भूमिका बघून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
आंदोलनकर्त्यांमध्ये हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांसह हिंदुत्वनिष्ठ ईश्वर बिल्होरे, बद्रीप्रसाद सोनी, अमित कुलकर्णी, सुखलालसिंह राजपुत, अशोक भगुरे, योगेशसिंह वर्मा, दुर्गेश शहाने, , शिवा राठी, देवीसिंह वर्मा, प्रकाश हजारे, विनोद राजपुत, विकास बिल्लोरे, सतिश निमट, संदीप गुसिंगे, गोकुळ राजपूत आदींचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here