जालन्यात पोलिसांवर खंडणीबहाद्दराकडून हल्ला

0
4

जालना: येथील खादगाव शिवारातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या सिध्दार्थ ऍग्रो कंपनीत चंदनझिरा ठाण्यातील दोन पोलीसावर
सराईत गुन्हेगार पप्पू घोरपडे व त्याचे तीन साथीदारानी हल्ला करून त्यांना जखमी केले.हे गुन्हेगार खंडणी वसुलीसाठी हातात खंजीर घेऊन गोंधळ घालत होते. ही घटना मंगळवारी रात्री घडली
याची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार मनसुब वेताळ आणि नापोकॉं. प्रभाकर वाघ हे त्याठिकाणी तातडीने दाखल झाले.
यावेळी पोलिसांनी खंडणी बहाद्दरांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी जमादार वेताळ आणि पोलीस कर्मचारी वाघ यांच्यावर खंजीराने हल्ला केला.
या हल्ल्यात वेताळ यांच्या छातीला गंभीर इजा झाली आहे. तर वाघ यांच्या पोटावर करण्यात येणारा वार त्यांनी हातावर झेलल्याने त्यांच्या हाताला गंभीर स्वरूपाची जखम झाली आहे.
हे दोन्ही पोलीस कर्मचारी जालना येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
याप्रकरणी पप्पू कचरू घोरपडे, नवनाथ शिवदास नाईकवाडे, तेजराव खडेकर (तिघेही रा. खादगाव) आणि चंदू आंबीलढगे (रा. शेकटा) या 4 जणांविरुद्ध पोलीस कर्मचारी प्रभाकर वाघ यांच्या फिर्यादीवरून भादंवि. 307, 353, 337, 332, 333, 326, 324, 504, 506, 34 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सावळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here