जालन्यात व्यापाऱ्याची तीन लाखाची रोकड चोरट्यांनी लुटली, भोकरदन नाका ते मोंढा रोडवर सकाळी ९ वाजता घडली घटना

0
4

जालना:शहरातील श्रीकृष्णनगर भागात राहणारे व्यापारी भरत शेळके यांचे नवीन मोंढ्यात लक्ष्मण ट्रेडर्स नावाचे आडत दुकान आहे.आज सकाळी ९वाजेच्या सुमारास शेळके हे मोंढ्यात 3 लाख 10 हजार रुपयांची रक्कम घेऊन मोटारसायकलवरून निघाले होते. मोंढा रोडवर वरकड रुग्णालयाजवळ पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोन इसमांनी शेळके यांच्याजवळील रोकड असलेली बॅग हिसकावून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे आणि स्थानिक ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here