जे ई एस येथे होणार आंतर महाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धा

0
17

जालना:येथील जे ई एस  महाविद्यालय आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन धनुर्विद्या मुले-मुली स्पर्धा दिनांक 14 दिसंबर मंगळवार रोजी होणार आहे या स्पर्धेकरिता महाविद्यालयाच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे तसेच या स्पर्धेकरिता विधापीठातीळ संलग्नित वेगवेगळे  महाविद्यालयाचे धनुर्धारी सहभागी होणार आहे। 
या स्पर्धेचे उद्घाटन भीष्म धनुर्विद्या संघटना जालना चे अध्यक्ष श्री बबलू सारस्वत यांच्या हस्ते जालना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तमजी बगडिया यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. स्पर्धा इंडियन राउंड, रिकर्व्ह राऊंड आणि  कंपाउंड राऊंड अश्या स्वरूपाची असणार आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणारी ही स्पर्धा विधापीठाने ठरविलेल्या प्रमाणे निवड चाचणीच्या स्वरूपात घेण्यात येतील तसेल सर्व खेळाडूंना *कोविड च्या दोन लस पूर्ण केलेचे प्रमाण पत्र आणणे आवश्यक आहे* असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस बी बजाज यांनी सांगितले या स्पर्धेकरिता जिमखाना समितीतील सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here