पंतप्रधानाच्या पंजाब दौऱ्यावरील प्राणघातक हल्ला हा काँग्रेसचा कट-भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे

0
8

जालना (प्रतिनिधी):- भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाब राज्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांच्या ताफयावर जो प्राणघातक हल्ला झाला तो काँग्रेसचा कट असून त्याचा भारतीय जनता पार्टी जिल्हा जालना च्या वतीन निषेध करुन मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या जिवीतावर आलेले संकट दुर होण्याासाठी देशकार्यासाठी त्यांना भरपुर निरोगी आयुष्य मिळावे व मा.ना.रावसाहेब पाटील दानवे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री,भारत सरकार यांना झालेली कोरोनाची लागन यातुन ते सुखरुप बरे व्हावे व पुन्हा देश कार्य व समाजाची सेवा चालु करावी यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे यांच्या उपस्थीतीत महामृत्युंजय, जप, होम, हवन व महाआरती जालना शहरातील प्रसिध्द असलेल्या पंचमुखी महादेव मंदीर पाणीवेश या घेण्यात आला.

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे म्हणाले की, पंजाब मधील फिरोजपुर येथे देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रमोदी यांच्या सुरक्षेत देशातील काँग्रेस नेतृत्वाच्या ईशाऱ्यावर राज्यातील काँग्रेस सरकारने दुर्लक्ष करुन मोठी चुक केली होती परंतु देवाच्या कृपेने व भारत देशातील सर्व नागरीकांच्या आर्शिवादाने पंतप्रधान नरेंद्र मोदी या हल्यातुन सुखरुप वाचले यापुर्वी ही सुरक्षेच्या त्रुटीमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहे.पंतप्रधानाच्या सुरक्षतेत केलेला निष्काळजीपणा व पंजाब सरकारने केलेल्या अक्षम्य गुण्याबद्दल संपुर्ण देशात काँग्रेस व पंजाब सरकारचा भाजपा जालना जिल्हयाच्या वतीने तिव्र निषेध करीत असून पंजाब व काँग्रेस सरकारचा निषेध म्हणून आज दिनांक 10 जानेवारी 2022 सोमवारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतीमेसमोर धरणा धरुन व राष्ट्रपिता महात्मागांधी यांच्या प्रतिमेसमोर मौन बाळगुन भारताची लोकशाही व सवीधान उध्दवस्त करु पाहणाऱ्या काँग्रेस पक्षाचा व पंजाब सरकारचा निषेध करण्यात आला यासह अनेक पंजाब सरकार व काँग्रेस पक्षाला केंद्र व राज्यसरकार यातील संबध कसे असले पाहिजे याबद्दल सद्बबुध्दी सुचावी यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करण्यात आली सदरील कार्यक्रम संपुर्ण जिल्हाभरात भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे,शहराध्यक्ष राजेश राऊत,संघठन सरचिटणीस सिध्दीविनयक मुळे,प्रदेश कार्यकारिणी निमंत्रीत सदस्य रामेश्वर पाटील भांदरगे,बद्रीनाथ पठाडे, जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव खरात, धनराज काबलिये, विरेंद्र धोका, प्रदेश महिला चिटणीस सौ.संध्याताई देठे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भागवत बावणे, सांस्कृतीक सेल जिल्हाध्यक्ष सौ.शुंभागीताई देशपांडे, उद्योगपती अर्जुन गेही,युवा मोर्चा शहराध्यक्ष सुनिल खरे,नगरसेवक महेश निकम,सुनिल राठी, शहर सरचिटणीस शिवराज जाधव, रोहीत नलावडे, विकास कदम, भगवान चांदोडे, सेवकराम नारीयलवाले, इंदरभैय्या गौरक्षक, डोंगरसिंग साबळे, अथर्व कुलकर्णी, अमोल धानुरे,करन झाडीवाले,नागेश बेनीवाल,नरेश जैस्वाल यांच्यासह मोठया प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते व आर्य समाजाचे महाराज पंडीत ज्ञानेंद्र शर्मा यांनी महामृत्युंजय, जप, होम, हवन व महाआरती यांनी केली. सर्व कार्यकर्त्यांनी मा.ना.रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रकृतीमध्ये लवकर चांगला फरक पडावा यासाठी ईश्वराला प्रार्थना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here