प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रच्या पाठीशी खंबीरपणे – गोरंट्याल

0
5

विवेकानंद हॉस्पीटल, इंजे मेडिकलच्या निर्णयाप्रमाणे इतरांनीही पत्रकारांना सहकार्याची भूमिका ठेवावी – इलियास खान

अप्रतिम नियोजन-संजय खोतकर

मालकांकडून येणार्‍या दबावामुळे पत्रकारांना लिखान करणे अवघड – जिल्हारत्न देशमुख

जालना/प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रच्या सभासदांसाठी उपचार व शस्त्रक्रियेसाठी जवळपास वीस टक्के सूट देण्याचा विवेकानंद हॉस्पीटलने घेतलेला निर्णय तसेच इंजे मेडीकल यांनी सभासदांसाठी औषधींवर भरघोस सूट देण्याचा घेतलेला निर्णय कौतूकास्पद आहे. त्यांच्याप्रमाणेच इतरांनीही सहकार्याची भूमिका ठेवून पुढे यावे, असे आवाहन प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रचे राज्य अध्यक्ष इलियास खान यांनी येथे केले.

प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्यावतीने जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अधक्षस्थानी ते होते. गुरुवार (दि 6) शहरातील आयएमए हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून युवा नेतृत्व संजय खोतकर तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते अक्षय गोरंट्याल, उद्योजक अरूण अग्रवाल, भाजपा शहराध्यक्ष राजेश राऊत, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंडगे, ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, कवियित्री संजिवणी तडेगावकर, देवगिरी विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबन सोरटी, इंजे मेडीकलचे संचालक आनंद इंजे, प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रचे राज्य सरचिटणीस विजयकुमार सकलेचा, जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात बोलतांना इलियास खान म्हणाले की, प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रची स्थापना करतांना अनेक अडचणी पार करून ही संघटना उभी केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी निश्‍चितच काम करू मात्र, त्या पत्रकारांच्या पाठीमागे असेलल्या परिवारासाठी काम करण्याची आमची इच्छा आहे. आजच विवेकानंद हॉस्पीटलच्यावतीने जे पत्रकार व त्यांचे कुटुबिय शासकीय योजनेत बसतील त्यांचा निश्‍चितच शासकीय योजनेत बसून उपचार केले जाणार असून जे पत्रकार आणि त्यांचे कुटूंबिय शासकीय योजनेत बसू शकणार नाही त्यांच्यासाठी रुग्णालयातील उपचार, शस्त्रकिया यावर 20 टक्के सवलत देण्याचा निर्णय विवेकानंद हॉस्पीटल प्रशासनाने घेतला आहे त्यांचे आम्ही स्वागत करतो. तसेच इंजे मेडीकलचे संचालक आनंद इंजे यांनी सुद्धा प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रच्या जालना जिल्ह्यातील सभासद आणि त्यांच्या परिवारासाठी घसघसीत सूट देण्याची जाहिर केले असून, जो सभासद आर्थिक अडचणीत असून जो औषधांचे खर्च करू शकत नसल्यास त्यास संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी फोन केल्यास त्यास 100 टक्के औषधी मोफत दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रच्यावतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आवाहन करतो की, जालना जिल्ह्यातील अनेक हॉस्पिटल आणि मेडीकलनी आम्हाला, असे सहकार्य करावे. सभासदांचा विमा काढल्या जात आहे. भविष्यातही विविध योजना राबविण्यात येणार असून त्याची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे.

उदघाटक युवा नेतृत्त्व संजय खोतकर म्हणाले की, दीपक शेळके यांनी आज जो कार्यक्रम घडवून आणला तो एवढा मोठा होईल, असे वाटले नाही, मात्र, त्यांच्या वृत्तपत्रांच्या नावाप्रमाणे आदर्श कार्यक्रम झाला. एवढ्या मोठ्या प्रमाणात अप्रतिम नियोजनाबद्दल मला आनंद होतो. मी प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष इलियास खान, सरचिटणीस विजयकुमार सकलेचा, जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके आणि त्यांच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकारांना एकत्रित करून उत्कृष्ट कार्यक्रम घडवून आणाला त्याबद्दल मी अर्जुनराव खोतकर परिवाराच्यावतीने त्यांच्यासह तमाम पत्रकारांना मनापासून शुभेच्छा देतो.

युवा नेते अक्षय गोरंट्याल म्हणाले की, पुर्वीच्या काळी पत्रकारिता करणे अवघड होते. वृत्तसंकलन करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत असे, आजही ते जुने पत्रकार आहेत. ते त्याच पद्धतीने काम करतात. मात्र, नविन पिढीतील पत्रकारांना एखाद्या विषयाचे संकलन करायचे असेल तर इंटरनेटच्यामाध्यमातून बसल्या ठिकाणी ती माहिती मिळते. त्यामुळे आजची पत्रकारिता सोपी झाली आहे. जुन्या काळातील पत्रकारितेतून केल्या जाणारी बातमी है वैविध्यपूर्ण असते. मला वृत्तपत्र वाचायची आवड आहे. मी दररोज वृत्तपत्र वाचतो. भविष्यात पत्रकारांना बातमी छापल्यावरून किंवा कुठल्याही कारणामुळे कुणाकडूनही त्रास झाल्यास अथवा धमक्या आल्यास त्यांच्या पाठीमागे प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रने खंबीर पणे उभे राहावे, प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रला जी मदत लागेल ती आपण करू, अशी ग्वाही श्री गोरंट्याल यांनी बोलतांना दिली.

प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्यावतीने स्व. शशीकांत पटवारी स्मरणार्थ जिल्हारत्न पुरस्काराने गौरविण्यात आलेले ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख यांनी स्व. शशीकांत पटवारी जिल्हा रत्न पुरस्कार देऊन गौरविल्याबद्दल संघटनेचे आभार मानले. व हा धागा धरून ते पुढे म्हणाले की, जालना जिल्ह्यातील पहिले दैनिक काढणारे शशीकांत पटवारी यांच्यासोबत मी काम केले असून त्यांचा धैर्यशिल आणि कर्तृत्ववान पत्रकार मी पाहला नाही. ते कुणालाही घाबरले नाही. सत्य मांडण्यासाठी ते तत्पर असायचे आणि त्यांच्या नावाचा हा पुरस्कार मला मिळाल्याने मला खूप मनस्वी आनंद झाला असून मी प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रचे धन्यवाद व्यक्त करतो. पत्रकारिता सध्या खूप अडचणीत चालली आहे. मालकांकडून होणारा दबाव पत्रकारांवर असलल्यामुळे त्यांना प्रखर पणे लिखान करणे अवघड झाले आहे. अनेक प्रश्‍नांना पुर्वी पत्रकार वाचा फोडायचे मात्र, या जाहिरातीच्या युगात हे कुठतरी लुप्त झाल्यासारखे वाटतं. इलेक्ट्रॉनिक माध्यम आल्यानंतर लोकांना वाटायचं की वृत्तपत्र संपतील मात्र, त्यांच्यापेक्षा वृत्तपत्रांवर लोकांचा विश्‍वास अधिक आहे. वृत्तपत्रात बातम्या रिपीट होत नाही. आणि इलेक्ट्रानिक माध्यम ही बातम्या वारंवार दाखवतात. इलेक्ट्रॉनिक मिडीयामधील वृत्त हे एखाद्या विशिष्ट घटकासाठी असते. तर वृत्तपत्र हे तळागळातील प्रश्‍न मांडण्याचे काम करते असेही श्री देशमुख यावेळी म्हणाले.

यावेळी कवियित्री संजिवणी तडेगावकर म्हणाल्या की, ‘नारायण’ हे त्याकाळचे पत्रकारचं. मात्र, त्यांना कुठेही रोखधोक नव्हती. त्यांनी इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा ही समाचार घेतला. एकच बातमी दिवसभर रिपिट केल्या जाते. अनेकांना वाटले होते वृत्तपत्र संपतील मात्र, तसे झाले नाही आणि भविष्यातही तसे होणे शक्य नसल्याचेही त्या म्हणाल्या. आपल्या साप्ताहिक चालविण्याचा अनूभव त्यांनी यावेळी कथन केला. कविंवर होणार्‍या अन्यायाला मी वाचा फोडते. त्याची किमतही चुकवावी लागते असे सांगतांनाच दैनिक चालविणे तर त्याही पेक्षा अवघड असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

प्रस्ताविक करतांना राज्य सरचिटणीस विजयकुमार सकलेचा म्हणाले की, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले वृत्तपत्र काढले त्यानिमित्ताने दर्पण दिन साजरा केला जातो. दर्पण दिन म्हणजे आम्हा तमाम पत्रकारांसाठी दिवाळीचा सण आहे. प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रच्यावतीने तीन महिन्यांपुर्वी जालना जिल्हा समितीची निवड झाली. आणि जिल्हा समितीने आज एवढा मोठा कार्यक्रम घडवून आणाला त्याबद्दल जिल्ह समितीचे अभिनंदन. भविष्यात पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबियसांसाठी विविध योजना राबविणार आहोत. तसेच पुढील वर्षांपासून चार राज्यस्तरीय पुरस्कार देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी राज्य अध्यक्षांच्या परवानगीने केली.

आभार व्यक्त करतांना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके म्हणाले की, आमच्या छोट्याशा निमंत्रणांवर आज ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर निमंत्रित आणि आमचे पत्रकार बांधव हजर राहिले त्यांचा मी आभारी असून भविष्यात जालना जिल्ह्यात पत्रकारांसाठी जे जे गरजेचे आहे ते ते करण्यासाठी प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्हा सदैव जिल्ह्यातील पत्रकारांसोबत राहील.

दरम्यान, स्व. शशीकांत पटवारी स्मरणार्थ जिल्हारत्न पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच स्व. उदय पटवारी स्मरणार्थ जालना भूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव राऊत, स्व. लक्ष्मणराव पायगव्हाणे स्मरणार्थ ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार बाबुजी तिवारी मंठा, स्व. राम उगले स्मरणार्थ ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार संजय भरतीया, भरत धपाटे, स्व. संतोष भालेराव स्मरणार्थ उदयोनमुख संपादक पुरस्कार मनोज कोलते, स्व. गणेशराव जळगावंकर स्मरणार्थ उदयोनमुख पत्रकार पुरस्कार अच्युत मोरे, स्व. रमेश पाटील स्मरणार्थ उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार अहेमद नूर, स्व. लक्ष्मीकांत ओझा स्मरणार्थ उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार अमृत तारो, स्व. श्रीकृष्ण भारुका स्मरणार्थ उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार भरत सवणे, नंदकुमार उढाण, स्व. संजीव देशमुख स्मरणार्थ उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार विजय सोनवणे, स्व. राजेंद्र तिरूखे स्मरणार्थ उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार लहू गाढे, पांडुरंग राऊत, स्व. रमेश बागडी स्मरणार्थ उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार विजय कमळे पाटील व स्व. सुरेंद्र जैस्वाल स्मरणार्थ ज्येष्ठ छायाचित्रकार पुरस्कारांने (प्रेस) बाबुराव व्यवहारे यांना सन्मानित करण्यात आले. स्व. दिगंबरराव शिंदे स्मरणार्थ जालना भुषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार दिलीप राठी यांना जाहिर झाला असला तरी त्यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांना हा पुरस्कार नंतर प्रदान करण्यात येणार असल्याचेही संयोजकांच्यावतीने कळविण्यात आले आहे.

प्रसंगी जिल्ह्यातील सर्वच उपस्थित पत्रकारांसह, छायाचित्रकार व वृत्तपत्र विके्रते व वृत्तपत्र वाटप करणारी मुले यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमा दरम्यान, इंजे मेडीकलच्या सहकार्याबद्दल संचालक आनंद इंजे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जालना जिल्हा उपाध्यक्ष शेख चांद पी.जे. यांनी केले.
दरम्यान, प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्या वतीने एक दिवसीय कोव्हीड 19 लसीकरण शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंडगे यांनी केले. शिबीरात अनेकांचे लसीकरण करण्यात आले.
कार्यक्रमासाठी कॉन्सीलचे जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेश काबरा, नरेंद्र जोगड, सय्यद रफिक, कोषाध्यक्ष शेख इलियास, सहसचिव गोपाल त्रिवेदी यांच्यासह जालना जिल्हा पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here