बंगळुरूमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान
जालनात मराठा महासंघ आक्रमक होत केला घटनेचा निषेध

0
11

जालना (प्रतिनिधी) ः बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अवमान झाल्याप्रकरणी जालनात मराठा महासंघ आक्रमक होत रविवार ता. 19 रोजी जालना शहरात मराठा महासंघाच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीसांची चांगलीच तारांबळ झाली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अवमानाची संतापजनक घटना घडल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे पडसाद जालनात उमटले?असून मराठा महासंघाच्या वतीने सदरील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
रविवार ता. 19 रोजी मराठा महासंघाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढत कर्नाटक येथील बंगलोर येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना च्या निषेधार्थ गांधी चमन येथे तीव्र निषेध व्यक्त करीत कर्नाटक राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन करून गांधीचमन येथून एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की, जय अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला?घोषणाबाजी करीत शनी मंदिर येथे मोर्चा काढण्यात आला. ऐनवेळी मोर्चाचे रूपांतर रास्तारोकोमध्ये करण्यात आल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
े देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा कर्नाटक येथील बंगळुरू येथे झालेला अवमान निषेधार्ह आहे. बंगळुरूची उन्नती शहाजी राजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मराठा महासंघाच्यावतीने करण्यात आली. दोषींवर कारवाई झाली नाही तर मराठा महासंघ अधिक तीव्रतेने पेटुन उठेल आणि राज्यात कर्नाटक सरकारची एकही बस फिरू देणार नाही असा इशारा शिवभक्तांनी दिला.
  यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, जगन्नाथ काकडे, जयंतराजे भोसले, अशोक पडुळ, ज्ञानेश्‍वर ढोबळे,
गणेश उबाळे,  धनंजय पोहेकर, प्रविण पाचफुले, सुनिल कदम, चंद्रकांत भोसले, मंगेश कापसे, महेश निकम, राजेंद्र जाधव, संजय देठे, दत्ता शिंदे, गणेश कदम, रमेश गजर, सुभाष चव्हाण, संतोष कर्‍हाळे,?आकाश जगताप, सागर पाटील, बालाजी माने, योगेश पाटील, दिलीप तळेकर, संदिप भोसले, महादेव टाले, बबन शेजुळ, राम सोळुंके, सचिन कचरे, मंगेश देशमुख, सोनाजी नाननवरे, दिपक आगलावे, किरण देशमुख, कैलास सरकटे, बाळासाहेब देशमुख, रविकुमार सुर्यवंशी, अनिल मदन यांच्यासह अनेक शिवभक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी जय बजरंग फाऊंडेशनचे संस्थापक विपुल राय, उपाध्यक्ष विनोद राऊत यांनी मराठा महासंघाच्या मोर्चाला पाठींबा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here