ब्राह्मण समाज संघर्ष समितीची जानेवारीत जनसंवाद यात्रा

0
5

पहिल्या टप्यात गंगाखेड ते जालना संवाद साधत शासन-प्रशासनाला प्रलंबित मागण्यांचे करून देणार स्मरण
जालना -( प्रतिनिधी)शासन-प्रशासन दरबारी खितपत पडलेल्या व दुर्लक्ष केल्या जात असणाऱ्या ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे स्मरण करून देण्यासाठी व या बाबत समाजात जनजागृती करण्यासाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती, महाराष्ट्रच्या वतीने जानेवारीत श्री भगवान परशुराम जनसंवाद यात्रा काढण्यात येणार असून याबाबतची महत्वपूर्ण बैठक जालना येथे सोमवारी पार पडली या बैठकीस समाजात कार्यरत असणाऱ्या संघटना,संस्था,पदाधिकारी, समाज बांधव यांनी उपस्थित राहून संवाद यात्रा जनजागृती अभियान राबविण्यासाठी सर्वजण सोबत असल्याचा एकमुखी निर्णय घेत संवाद यात्रेचे भव्यदिव्य स्वागत करण्यात येणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून एक हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात यावी, के.जी.टू पी.जी.शिक्षण मोफत देण्यात यावे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्यात यावे, पुरोहित बांधवाना मानधन सुरू करावे, कुळात गेलेल्या जमिनी परत कराव्यात, स्वा.सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे यासह इतर विविध मागण्यांसाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती, महाराष्ट्रच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शासन-प्रशासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे, अनेक आंदोलने करून निवेदने सरकार दरबारी लाल बसत्यात खितपत पडली आहेत. ब्राह्मण समाजाच्या मागण्यांकडे सर्वच राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी हे दुर्लक्ष करत असल्याची भावना समाजाच्या मनात निर्माण झाल्याने ब्राह्मण समाज संघर्ष समिती च्यावतीने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात 8 जानेवारी ते 12 जानेवारी 2022 या कालावधीत समाज जनजागृती संवाद व शासन-प्रशासनास प्रलंबित मागण्यांचे स्मरण करून देण्यासाठी ही संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या बाबत सर्वच जिल्हयात समाजाच्या बैठका घेऊन या संवाद यात्रेचे नियोजन समाज बांधव, संघटना करत आहेत. सोमवारी जालना येथील सर्व संघटना, पदाधिकारी, यांची याबाबत महत्वपूर्ण बैठक सर्वज्ञ हाँल येथे समितीचे समन्वयक ॲड बलवंत नाईक, ॲड केशव नाईक,आर आर जोशि,अनंत वाघमारे, एल आर कुलकर्णी,प्रदीप देशपांडे, शशिकांत दाभाडकर, अनिकेत अय्यर, आनंदी अय्यर,दिपा बीनीवाले,रोहीनी टाकळकर, मुख्य समन्वयक महाराष्ट्र दिपक रननवरे, आदी समाज बांधव,पदाधिकारी उपस्थित होते, बैठकीत संवाद यात्रा जनजागृती अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आपले विचार व्यक्त करून ही जनसंवाद यात्रा समाजासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी महत्वाची ठरणार असून सर्वांनी यात गट-तट, लहान-मोठा कोणताच भेद मनात न ठेवता संवाद यात्रेचे भव्य-दिव्य स्वागत करण्यात येणार असल्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती महाराष्ट्र ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या साठी श्री भगवान परशुराम जनसंवाद यात्रा
दिनांक 8 जानेवारी ते 12 जानेवारी 2022 पर्यंत पहिला टप्पा शुभारंभ शनिवार दिनांक 8 जानेवारी गंगाखेड, पाथरी रविवार दिनांक 9 जानेवारी माजलगाव,सिरसाळा,नागापूर अंबाजोगाई सोमवार दिनांक 10जानेवारी
मुरुड ,ढोकी कळम केज मंगळवार दिनांक 11जानेवारी धारुर, वडवणी, बीड बुधवार दिनांक 12 जानेवारी
गेवराई ,औरंगाबाद ,बदनापूर व जालना येथे या संवाद यात्रेचा पाहिला समारोप होणार आहे.या
श्री भगवान परशुराम जनसंपर्क संवाद यात्रेत समाजबांधव, महिला भगिनी, युवक युवतींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ब्राह्मण समाज संघर्ष समिती, जालनाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here