मंठा अर्बन बँकेची कर्ज वसूली मोहीम सुरू शहरातील कर्जदारांचे धाबे दणाणले

0
23


जालना (प्रतिनिधी) ः येथील मंठा अर्बन कॉ. अ‍ॅप. बँक जालना शाखेच्यावतीने कर्ज वसुलीची सक्तीची मोहीम सुरू करण्यात आल्याने कर्जदारांचे धाबे दणाणले आहेत. या विषयी सविस्तर वृत्त असे की, मागील चार महिन्या पूर्वी मंठा अर्बन बँकेला आरबीआय बँकेने आर्थिक निर्बंध लावले होते. त्या नुसार मागील महिन्यात या बँकेवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील प्रशासन विभागाचे प्रमुख सहाय्यक निबंधक संजय भालेराव यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
मागील एक वर्षापासून बहुचर्चित असलेली मंठा अर्बन कॉ-ऑपरेटिव बँकचे अध्यक्ष व संचालक प्रशासकीय अधिकारी यांचे राजीनाम्यामुळे चर्चेत राहिलेली आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बँकेवर अखेर प्रशासक म्हणून जालना सहाय्यक निबंधक एस. बी. भलेराव यांची नियुक्ती करण्यात आली. या अगोदरच जालना शाखेच्या वसूली अधिकारी म्हणून श्रीमती योगिता शिंदे यांनी वसूली जोमाने सुरू केली होती. त्यातच मध्यतरीच्या काळात रिजर्व बँकेने मंठा अर्बन बँकेवर काही निर्बध लावले असतांना अचानक दोन महीने प्रशासनाची नियुक्ती झाली. बँकेचे मुख्यालय मंठा येथे असून जालना शहरात दोन शाखा आहेत. जालना शहरातील लक्कडकोट भागातील शाखेने अल्पशः कर्ज वाटप असून मोठ्या नागरीकांच्या मुदत ठेवी असून कर्ज वसुली सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे. या बँकेच्या वसूली अधिकारी श्रीमती योगिता शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर कर्जदारांना नोटीसा पाठविल्या असून कर्ज वसूली मोहीम राबवित आहेत. या कर्ज वसूली मोहीमे अंतर्गत जालना शहरातील काही नामांकित व्यापारी, उद्योजक, अधिकारी कर्मचारी यांच्याकडे जाऊन बँकेच्या वसुलीसाठी तगादा करण्यात येत आहे. तसेच सरफेसी व कलम 101 अंतर्गत कारवाई प्रक्रीया सुरू असून जालना शहरातील दोन्ही बँकेच्या शाखेत धडक वसूली मोहीम सुरू आहे. कर्जदारांवर, सभासदांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. अशी माहीती सुत्रांकडून मिळाली आहे. मंठा अर्बन कॉ. अ‍ॅप. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वसूली पथक स्थापन करण्यात आले असून यामध्ये बँकेचे कर्मचारी वसूली विभाग प्रमुख श्रीमती योगिता शिंदे, विजय चव्हाण, संजय राठोड, कृष्णा मानकर, अनिरूध्द कदम आदी वसूली पथकात काम करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here