मराठवाडयात बळिराजा धावला  महावितरणच्या मदतीला

0
12

महिन्याभरात 74,000 बळिराजाकडून 45 कोटी रूपये वीज बिल भरणा

औरंगाबाद :महावितरण कंपनी  वीज बिलाच्या थकबाकीमुळे प्रचंड अडचणीत सापडले आहे. यासाठी शेतक—यांना कृषीपंपाचे वीज बिल भरण्यासाठी मेळावे घेवून वीज बिल भरणे का गरजेचे आहे,हे पटवून दिले. तसेच चालू दोन वीज बिले भरल्यास नादुरूस्त अथवा जळालेले रोहित्र बदलून देण्याचा महावितरणने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. मराठवाडयातील औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलात नोव्हेंबर मध्ये  73,553  शेतक—यांकडून 45 कोटी 28 लाख रूपयांचा भरणा करून महावितरणच्या धोरणात्मक निर्णयाला उदंड प्रतिसाद दिला आहे.  

    महावितरणकडून कृषी धोरण 2020 नुसार कोरोनाचे सुरक्षित अतंर राखून कृषीपंपाच्या वीज बिल वसूलीसाठी  शेतक—यांचे मेळावे घेवून लोकप्रबोधन करून जनजाग्रती करण्यात येत आहे. या मेळाव्यात महावितरणला वीज फुकट मिळत नाही. वीज निर्मिती कंपन्यांकडून दरमहा वीज विकत घेतल्याने त्याचे पैसे दयावे लागते. ही वीज वहन करून महावितरण कंपनीच्या 33 केव्ही उपकेंद्रापर्यंत  आणण्याचा महापारेषण कंपनीला वहन आकार दयावा लागतो.

    कृषीपंप रोहित्र नादुरूस्त अथवा जळाल्यास ते दुरूस्त करण्यासाठी आॅईल व इतर सामग्रीसाठी लागणारा खर्च, दुरूस्तीच्या एजंन्सीचा खर्च  महावितरणला करावा लागतो. तसेच रोहित्र जागेवरून फिल्टर युनिटला दुरूस्तीसाठी आणने. व  ते दुरूस्त करण्यात आलेले रोहित्र  परत शेतात त्या जागेवर बसविण्यासाठी  ने आण करून बसविण्याचा खर्च महावितरणला करावा लागतो. तसेच महावितरणकडून शेतक—यांसाठी अल्पदरात वीज पुरवठा केला जातो.  हा सर्व खर्च महावितरण कंपनीला करावा  लागतो. म्हणून महावितरण कंपनी आर्थिक संकटात सापडल्याने वीज बिल वसूलीशिवाय पर्याय नाही. अशी माहिती शेतक—यांना मेळाव्यात महावितरणकडून देण्यात आल्याने  शेतकरी स्वता:हून वीज बिल भरण्यासाठी प्रतिसाद देत पुढाकार घेत आहेत.  

     यात माहे नोव्हेंबर महिन्यात औरंगाबाद परिमंडलात 18,887 शेतक—यांकडून 11 कोटी 16 लाख रूपयांचा भरणा केला आहे. लातूर परिमंडलात 35,148 शेतक—यांकडून 22 कोटी 62 लाख रूपयांचा भरणा केला आहे. नांदेड परिमंडलात 19,518 शेतक—यांकडून 11 कोटी 49 लाख रूपयांचा भरणा केला आहे. मराठवाडयात 73,553  शेतक—यांकडून 45 कोटी 28 लाख रूपयांचा भरणा करून महावितरणच्या धोरणात्मक निर्णयाला उदंड प्रतिसाद दिला आहे.  

माहे नोव्हेंबरमध्ये  भरणा केलेली रक्कम कोटी रूपयांमध्ये
परिमंडल      कृषी ग्राहक     भरणा केलेली रक्कम
औरंगाबाद      18887       11.16
लातूर         35148       22.62
नांदेड         19518       11.49  
मराठवाडा      73554       45.28  

      कृषी धोरणानुसार रोहित्रावरील दोन चालू वीज बिले 80 टक्के कृषी ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा केल्यास रोहित्र दुरूस्त करून देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.  रोहित्र नादुरूस्त अथवा जळाल्यास चालू दोन कृषीपंपांची वीज बिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here