महामारीच्या भयंकर काळात जगण्याचे बळ देणारा  आधार म्हणजे संत विचार-
प्रणवमहाराज जोशी

0
14

केळीगव्हाण येथे भागवत सप्‍ताहास उत्साहात प्रारंभ
जालना, प्रतिनिधीःकोरोना महामारी मध्ये जगण्यासाठी लागणारी सकारात्मक ऊर्जा  आम्हला संत विचार देतात, श्रीमद् भागवत ग्रंथांच्या श्रवणाने मानवी आयुष्याचे सार्थक होते असे प्रतिपादन ह.भ.प. प्रणव रवींद्र जोशी महाराज यांनी केले.
 केळीगव्हाण येथे आयोजित भागवत कथा निरूपण प्रसंगी ते बोलत होते. येथील विठ्ठल- रूक्मिीणी मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने  8 ते 14 डिसेंबर दरम्यान भागवत कथेसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराज म्हणाले की,  श्रीमद् भागवता सारखा महान ग्रंथ नाही. ही कथा आई – वडिलांच्या पुण्याई शिवाय व संत कृपे शिवाय ऐकायला मिळत नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणूनी विठ्ठल आवडी या संत उक्तीप्रमाणे पुण्य संचय असेल तरच श्रीमद् भागवत श्रवणाचा लाभ होतो. भागवत कथेसह भजन, भक्‍तीगीतांचे कार्यक्रम यानिमित्ताने होत आहे. कोरोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम होत असून, भागवत कथेचा लाभ घेण्याचे आवाहन केळीगव्हाण ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here