महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आमलात आणावे ः अ‍ॅड. चव्हाण

0
23


जालना (प्रतिनिधी) ः भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे महिलांना दिलेले अधिकारी आणि कर्तव्य यातून समाज परिवर्तन करण्याचा प्रयत्न महिलांनी करावा, असे प्रतिपादन महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य संस्थेचे सचिव अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांनी आज येथे बोलतांना केले. महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय जागतिक महिला दिना निमित्त आयोजीत कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे सचिव अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांच्या हस्ते राजमाता जिजाउ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी पुढे बोलतांना अ‍ॅड, चव्हाण राजमाता जिजाउ आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकून उपस्थितांना सखोल असे मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा. डॉ. पी. व्ही. वनंजे, प्रा. डॉ. आर. एन. हिवराळे, प्रा. डॉ. सुवर्णा चव्हाण, प्रा. डॉ. स्मिता चव्हाण यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सर्जेराव कहाळे यांनी केले तर शेवटी आभार प्रा. डॉ. पी. टी. शिंदे यांनी मानले. याप्रसंगी रमेश खरात, बबनराव राठोड, श्रीमती जे. एन. महागडे, ए. एम. शिंदे, के. जी. कुरंगळ, ग. रा. मेहेत्रे, डब्ल्यु. आर. वाघ, ज्ञानेश्वर मदन, रविंद्र झोटे, आय. ए. शिंदे, अशोक राठोड, बी. बी. तुपे, एम. डब्ल्यु. खरात, गौतम रोडे, विजय मेहेत्रे, राजु गरूड आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here