मोतीबाग सुरू करण्याची भाजप सांस्कृतिक सेलची मागणी
मुख्याधिकार्‍यांना निवेदन

0
12

जालना, प्रतिनिधीः शहरवासीयांचे विरंगुळ्याचे ठिकाण असलेले मोतीबाग सुरू करण्याची मागणी  भाजप सांस्कृति सेलच्यावतीने नगर पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी उपमुख्याधिकारी शिंदे यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनात म्हटले की, कोरोना काळापासून मागील दीड वर्षांपासून मोतीबाग बंद असल्याने शहरवासीयांचे विरंगुळ्याचे ठिकाण बंद आहे. परिणामी बालकांसह मोठ्यांमध्येही नाराजीचे वातावरण आहे. कोरोना परिस्थिती सध्या आटोक्यात आहे. नगर पालिकेने मोतीबाग तात्काळ सुरू करण्याची गरज आहे. चौपटी परिसरात स्वच्छता मोहीम राबवून रोडरोमिओंचा व मोकाट जनावरांचा  बंदोबस्त करावा. मोतीबागेच्या समोरील भागात गतीरोधक उभारून वाहतूक  सुरळीत करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी सांस्कृतिक सेलच्या जिल्हाध्यक्षा शुभांगी देशपांडे, संपदा कुलकर्णी, दीपाली बिन्नीवाले, अमृता पाटील, जान्हवी वैद्य आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here