मोती तलावातील तथागत गौतम बुध्‍द मुर्ती स्‍थापनेची दुसरी बैठक संपन्‍न

0
27


जालना दि.०६ मार्च २०२१ रोजी जालना शहरातील मोती तलाव चौपाटी येथे तलावात तथागत गौमत बुध्‍द मुर्ती स्‍थापनेसाठी समाजाची दुसरी बैठक संपन्‍न झाली या बैठकीच्‍या अध्‍यक्ष स्‍थानी राजेश रामभाऊ राऊत (माजी उप‍नगरअध्‍यक्ष न प जालना ) हे होते
या बैठकीत सऊद इंजी.(न.प. जालना ) यांनी समाजापुढे मागील समीती व कामाच्‍या बाबतील राहीलेल्‍या उणिवा यांची माहिती दिली तसेच मागील समितीत उपाध्‍यक्ष म्‍हणुन राजेश रामभाऊ राऊत हे होते. तेव्‍हा जुनी समीती बरखास्‍त करुन नविन समिती तयार करण्‍याचे सर्वांनुमते ठरविण्‍यात आले नविन समीतीने पाठपुरवा करुन १४ एप्रील २०२१ भुमी पुजन करावे. असे या बैठकीत ठरले
जालना नगरपालीकेने गेल्‍या अनेक वर्षापासुन समाजाला खुश करण्‍यासाठी मोती तलावात तथागत गौतम बुध्‍दाची भव्‍य मुर्ती बसविण्‍याचा निर्णय घेतला होता त्‍यासाठी समीती स्‍थापन करुन तथागत गौतम बुध्‍दाची मुर्ती तयार करण्‍याचे काम औरंगाबाद येथील एका शिल्‍पकार ला देण्‍यात आले होते मुर्ती चे काम पुर्ण झाले आहे. परंतु जालना नगरपालीकेने बुध्‍द मुर्ती जालना शहरातील मोती तलावात स्‍थापन करण्‍यास टाळाटाळ केली आहे. म्‍हणुन तथागत गौतम बुध्‍द मुर्ती स्‍थापना संघर्ष समिती ने दि.०३ मार्च २०२१ रोजी पहिली बैठक आनंद नगर येथील अजींठा बुध्‍द विहारात घेतली तसेच दुस-या बैठकीच्‍या नियोजन व निमंत्रक सुनिल रत्‍नपारखे यांनी केले या बैठकीस अॅड.बी.एम साळवे , अॅड.ब्रम्‍हानंद चव्‍हाण , सुधारकर सेठ रत्‍नपारखे , प्रमोद रत्‍नपारखे ,एन.डी गायकवाड , रोहीदास गंगातीवरे ,सुधाकर निकाळजे , अण्‍णासाहेब चितेकर , विलास डोळसे , अरुण मगरे ,कपील खरात , किशोर बोर्डे , सुनिल साळवे , संदीप साबळे , संजय हेरकर , अरुण डोळसे , दिपक डोके ,मणकर्णा डांगे , आनिता वंगारे , निलेश सोनवणे , संदीप रत्‍नपारखे , विजय लहाने , परेश्‍वर गरबडे , प्रकाश भोरे , सुहास साळवे , कैलास रत्‍नपारखे , राजु मोरे , अनिल रत्‍नपारखे ,काशीनाथ मगरे , शरद खाकरे , संतोष लहाने ,सुरेश डावखरे , राहुल खरात , या सह मोठया संख्‍येने समाज बांधव उपस्‍थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here