लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात येळ अमावस्या रविवारी उत्साहाच्या वातावरणात झाली.

0
5

लातूर: लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात येळ अमावस्या रविवारी उत्साहाच्या वातावरणात झाली. दोन वर्ष कोरोनाच्या साथीमुळे या सणावर निर्बंध आले होते. यंदाही कोरोनाचे सावट असले तरी लातूर, उस्मानाबादकरांनी येळ अमावस्येचा आनंद लूटला. पहिल्या छायाचित्रात माजी मंत्री व आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे सहकुटुंब अमावस्या साजरी करण्यासाठी शेतात उपस्थित होते. या वेळी लातूरच्या माजी खासदार व त्यांच्या मातोश्री रूपाताई पाटील निलंगेकर उपस्थित होत्या. दुसर्‍या छायाचित्रात येळ अमावस्येसाठी मांडलेली पूजा तिसर्‍या छायाचित्रात आप्‍त स्वकियांना शेतात भोजनासाठी बोलाविण्यात आले होते, त्याची पंगत. मूळ कर्नाटकी असणारा पण उस्मानाबाद,लातूर आणि परळीच्या काही भागात साजरा होणारा कृषिप्रधान उत्सव आहे. मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणार्‍या सातव्या अमावास्येला हा उत्सव असतो. आपल्या शेतातल्या काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी तिची मनोभावे पूजा केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here