वाढदिवसाचा केक कापणे पडले महागातएकजण गजाआड,सदर बाजार पोलिसांची कामगिरी

0
5

जालना: सदर बाजार जालना पोलीस बस स्थानक परीसरात सोमवारी गस्त घालत असताना त्यांना खबरीमार्फत माहीतीमिळाली की, दर्गा समोर एक व्यक्ती धारधार खंजर बाळगुन उभा आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाले वरुन पोलीसानी तात्काळ सदर ईसमास ताब्यात घेऊन त्यांचे कडे चौकशी केली असता त्यांचे कमरेला एक धारधार खंजर मिळुन आल्याने पोलीसानी अधीक चौकशी केली असता सदर  आरोपी नाव परमेश्वर नामदेव जाधव वय 22 वर्ष रा. माळशेंद्रा ता. जालना याच्या  माळशेंद्रा येथे धारधार तलवार असल्याची माहीती आरोपीने सांगितली व त्याच तलवारीने त्याने लहान मुलाचा वाढदिवस साजरा केला होता. असेही सांगीतले पोलीसानी माळशेंद्रा येथे जाऊन आरोपीचे शेतातुन ठेवलेली तलवार जप्त केली आहे. पोलीसानी या वेळी दोन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.आरोपीकडुन एक धारधार तलवार व एक धारधार खंजर असा 2500 रुपयेचा ऐवज जप्त केला आहे.सदर कामगीरी भोकरदन नाका चौकीचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक नितीन काकरवाल साहेब, यांचे सह खार्डे,वाघमारे,हिवाळे, मुराडे यांनी पार पाडली.        

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here