व्यसनमुक्तीतील फेलोशिपबद्दल डॉक्टर सुरज सेठीया यांचा सत्कार

0
14

व्यसनमुक्तीसाठी पालकांचे शिबीर घेणार – लॉ. अशोक हुरगट

जालना/प्रतिनिधी– आज व्यसनाची व्याख्या बदलत आहे. पूर्वी व्यसन म्हटले की दारू, गांजा, अफिम, धुमपान ई. समोर येते. परंतु, आजच्या प्रगत काळात नविन व्यसनाने पिढी मानसिक रुग्ण होत आहेत. ते व्यसन आज प्रत्येकाच्या घरात बालकापासुन थोरापर्यंत लागले आहे. अनेक पालकांना त्यांच्या अपत्याविषयी कौतुक करताना त्या व्यसनाविषयी गोडी वाटते. परंतु कालांतराने तीच मूल मानसिक रोगाने ग्रस्त होत आहेत. ते व्यसन म्हणजे मोबाईल व टीव्ही. आज या व्यसनाने अनेक कौटुंबीक वाद होत आहेत. त्यामुळे याला जवाबदार पालकांना मार्गदर्शनासाठी लायन्सतर्फे शिबीर घेणार असल्याचे गोल्डचे अध्यक्ष अशोक हुरगट यांनी डॉ. सुरज सेठीया यांना व्यसनमुक्तीत पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप मिळाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात सांगितले. याकामी डॉ. सुरज सेठीया यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनाचे दुरगामी परिणाम व उपाय सांगण्यात येतील, असे ते म्हणाले.
यावेळी माजी प्रांतपाल लॉ. विजयकुमार बगडीया, लायन्स गोल्ड ग्रुपचे लॉ. रामकुवर अग्रवाल, लॉ. कमल गोयल, जनसंपर्क अधिकारी लॉ. अशोक मिश्रा, लॉ. रमेश अग्रवाल, पवन‌ सेठीया, लॉ. साधना सेठीया, डॉ. किरण सेठीया यांच्यासह अनेक सदस्य हजर होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ. सुरज सेठीया यांनी आपले अनुभव कथन केले. पालकांनी आपले पाल्य मोबाईल चालवण्यात प्रविण असल्याची शेखी न मिरवता त्यांना त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा; जेणेकरून भविष्यात त्या मुलांना मानसीक व शारीरीक व्याधी होणार नाहीत. महाविद्यालयीन विद्यार्थी तर व्यसनाच्या अशा पायरीपर्यंत जात आहेत की, त्यामुळे त्यांचे हातुन गंभीर गुन्हे घडत आहेत व युवा शक्ती भरकटत आहे, त्यासाठी लायन्स क्लबच्या शिबिरामार्फत सेवा देण्यात आपणास आनंद होईल व माझे हातून समाज सेवा घडेल, असे डॉ. सुरज सेठीया यांनी सांगितले. व्यसनाधीन व्यक्तीला औषधोपचारासोबत समुपदेशाची नितांत गरज असत्याचे डॉ. सेठीया म्हणाले.
यावेळी लॉ. बगडीया, लॉ. रामकुंवर अग्रवाल यांनीही लॉयन्समार्फत या क्षेत्रात भरीव योगदान देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लॉ. अशोक मिश्रा यांनी केले तर आभार लॉ. रमेश अग्रवाल यांनी मानले.

जालना/प्रतिनिधी- आज व्यसनाची व्याख्या बदलत आहे. पूर्वी व्यसन म्हटले की दारू, गांजा, अफिम, धुमपान ई. समोर येते. परंतु, आजच्या प्रगत काळात नविन व्यसनाने पिढी मानसिक रुग्ण होत आहेत. ते व्यसन आज प्रत्येकाच्या घरात बालकापासुन थोरापर्यंत लागले आहे. अनेक पालकांना त्यांच्या अपत्याविषयी कौतुक करताना त्या व्यसनाविषयी गोडी वाटते. परंतु कालांतराने तीच मूल मानसिक रोगाने ग्रस्त होत आहेत. ते व्यसन म्हणजे मोबाईल व टीव्ही. आज या व्यसनाने अनेक कौटुंबीक वाद होत आहेत. त्यामुळे याला जवाबदार पालकांना मार्गदर्शनासाठी लायन्सतर्फे शिबीर घेणार असल्याचे गोल्डचे अध्यक्ष अशोक हुरगट यांनी डॉ. सुरज सेठीया यांना व्यसनमुक्तीत पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप मिळाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात सांगितले. याकामी डॉ. सुरज सेठीया यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनाचे दुरगामी परिणाम व उपाय सांगण्यात येतील, असे ते म्हणाले.
यावेळी माजी प्रांतपाल लॉ. विजयकुमार बगडीया, लायन्स गोल्ड ग्रुपचे लॉ. रामकुवर अग्रवाल, लॉ. कमल गोयल, जनसंपर्क अधिकारी लॉ. अशोक मिश्रा, लॉ. रमेश अग्रवाल, पवन‌ सेठीया, लॉ. साधना सेठीया, डॉ. किरण सेठीया यांच्यासह अनेक सदस्य हजर होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ. सुरज सेठीया यांनी आपले अनुभव कथन केले. पालकांनी आपले पाल्य मोबाईल चालवण्यात प्रविण असल्याची शेखी न मिरवता त्यांना त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा; जेणेकरून भविष्यात त्या मुलांना मानसीक व शारीरीक व्याधी होणार नाहीत. महाविद्यालयीन विद्यार्थी तर व्यसनाच्या अशा पायरीपर्यंत जात आहेत की, त्यामुळे त्यांचे हातुन गंभीर गुन्हे घडत आहेत व युवा शक्ती भरकटत आहे, त्यासाठी लायन्स क्लबच्या शिबिरामार्फत सेवा देण्यात आपणास आनंद होईल व माझे हातून समाज सेवा घडेल, असे डॉ. सुरज सेठीया यांनी सांगितले. व्यसनाधीन व्यक्तीला औषधोपचारासोबत समुपदेशाची नितांत गरज असत्याचे डॉ. सेठीया म्हणाले.
यावेळी लॉ. बगडीया, लॉ. रामकुंवर अग्रवाल यांनीही लॉयन्समार्फत या क्षेत्रात भरीव योगदान देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लॉ. अशोक मिश्रा यांनी केले तर आभार लॉ. रमेश अग्रवाल यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here