संस्कार प्रबोधिनीत विद्यार्थींचे पुष्पवृष्टीने स्वागत निसर्गाने स्त्रीच्या हातात दिले सृजनाचे प्रतिक-प्रा.ज्योती धर्माधिकारी

0
29


जालना : निसर्गाने स्त्रीच्या हातात सृजनाचे प्रतिक दिले आहे. त्यामुळे तिने कुटुंब सांभाळून स्वत:ला सिध्द केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. ज्योती धर्माधिकारी यांनी येथे बोलतांना केले.
संस्कार प्रबोधिनीत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन विद्यार्थींनींना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. स्त्रीचा सन्मान व्हायलाच पाहिजे. सावित्रीचा वसा तिला चालवायचा आहे. यासाठी तिने स्वत:ला सिध्द करुन सामर्थ्यशाली स्त्री म्हणून पुढे आले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. प्रारंभी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विद्यालयाच्यावतीने विद्यार्थींनींवर पुष्पवृष्टी करुन त्यांचे स्वागत करण्यात आले. तर विद्यालयातील श्रीमती रेखा हिवाळे व श्रीमती किर्ती कागबट्टे यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी श्रीमती हिवाळे व कागबट्टे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन उपक्रमशिल शिक्षक रामदास कुलकर्णी यांनी केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ईश्‍वर वाघ, किरण धुळे, रशीद तडवी, पवन साळवे आदींची उपस्थिती होती. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी, विजय देशमुख, विनायकराव देशपांडे, प्रा. राम भाले, प्रा. केशरसिंह बगेरिया, रणजीत ठाकूर, डॉ. जुगलकिशोर भाला आदींनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here