हिवाळी अधिवेशनात
जालना जिल्ह्यातील 206 कोटींच्या विकास कामांना मंजुरी

0
8

जालना दि. 23 (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील विविध विकास कामांकरीता राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या प्रयत्नातून हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यामध्ये सुमारे 206.63 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली. निधी मंजुर झालेल्या कामांमध्ये अंबड येथे महसुल अधिकारी व कर्मचारी यांच्याकरीता निवासस्थान बांधकाम जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच उपविभागीय कार्यालय, जालना येथील कार्यालयांतर्गत सजावट व फर्निचर कामे करणे. अंबड तालुक्यात 44 तलाठी कार्यालय बांधकाम करणे. जालना येथे कृषी भवन इमारतीचे बांधकाम करणे. घनसावंगी येथील विश्राम गृहाचे नुतनीकरण व विस्तारीकरण करुन, दोन साधारण व दोन व्ही. आय.पी. सुटचे बांधकाम करणे. अंबड येथे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय करणे व निवासस्थान बांधकाम. घनसावंगी येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, करणे व निवासस्थान बांधकाम. जिल्हा रुग्णालय, जालना येथील दुरुस्ती (सुप्रमा). जालना येथील 365 खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम करणे आदी कामांच्या समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here