श्रीराम मंदिर निधी संकलनासाठी गाव,वाडी,वस्तीवर फिरले १५ हजार २१६ राम सेवक

0
24
Ram Sewakजालना : अयोध्यात भव्यदिव्य निर्माण होणाऱ्या श्रीराम मंदिर उभारणी निधी
संकलनाचे कार्य जालना जिल्ह्यात पुर्ण झाले असून यासाठी श्रीराम भक्त
जिल्ह्यातील ९६३ गाव,वाडी,वस्तीवर जावून श्रीराम निधी संकलन केला.
जिल्ह्यात रामभक्तांकडून श्रीराम मंदिर निर्माणासाठी 13कोटी 38लाख 90
हजार 313रुपये इतका निधी संकलन करण्यात आला आहे. सदरील निधी हा कुपन व
पावतीव्दारे जमा करण्यात आला. तसेच ऑनलाईनच्या माध्यमातून थेट अयोध्या
श्रीराम मंदिर उभारणीच्या खात्यात निधी जमा झाला आहे.


राम मंदिर बांधण्याची माहिती रामसेवकांनी जिल्ह्यात सर्व राम भक्तांना
प्रत्यक्ष जावून सम्पर्क करुन दिला व त्याची जोडणी निधीसहीत केली. सदरील
कार्यक्रमाचा भाग म्हणून ७०० शोभा यात्रा निघाल्या. यावेळी
रामभक्तांनी जय श्रीराम….जय श्रीराम…..जयघोष केला. यात लाक्षणिय
महिला, बाल रामभक्तांनी सहभाग नोंदविला. यावेळी बालरामभक्तांनी
श्रीराम-लक्ष्मण, माँ सिता, लव-कुश यांची वेशभुषा करुन राम मंदिरासाठी
निधी संकलन केला. यावेळी रामभक्तांनीही सढळ होताने निधी दिला.
जिल्ह्यातील ८ तालुक्यांमध्ये १० सामाजिक सदभाव बैठकी २३ न्यातीचे (जातीचे) प्रतिनिधींत्व करणारे २६४ राम भक्तांचा सहभाग होता
. ३८ महिला मेळावे १२३० महिलांच्या उपस्तिथीचे पार पडले . निधी संकलनादरम्यान जालना शहरात १८ ठिकाणी तर जालना तालुक्यात १४ श्रीरामांची पथनाट्य १० महाविद्यालयीन विद्यार्थी आणि १२ विद्यार्थिनींनि सादर
केले ज्यात ७५०० दर्शक सहभागी झाले. जिल्हयात २ समेलनात १२४ संत महंतांचा सहभाग हा लक्षणिय होता. या व्यापक अभियानाचे
स्वरुप शहरी भागात साधारणपणे १० हजार लोक संख्येची वस्ती तसेच ग्रामीण
भागात आठ ते दहा गावे मिळून एक मंडळ आणि तीन ते चार मंडळे मिळून एक उपखंड
अशी प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी रामसेवकांची रचना करण्यात आली. याच
दरम्यान राम सेवकांचे काही ठिकाणी स्वागत गुलाल व फुलांची उधळन करुन
पुजा करण्यात आली. यावेळी प्रत्येक ठिकाणी अंगणात रांगोळी व सडा टाकुन
उत्साह दर्शविण्यात आला. सोशल मिडियाव्दारे श्रीराम मंदिर उभारण्याची
माहिती प्रसारीत करण्यात येत होती.
निधी संकलन करतांना अस्मरणीय असे खुप अनुभव रामसेवकांना आले तसेच श्रीराम
मंदिर निर्माण निधी संकलनासाठी जालन्यातील तृतीय पंथांनीही सहभाग
नोंदविला.

सदरील माहिती
श्रीराम जन्मभुमी मंदिर निर्माण निधी संकलन समिती जालना उपाध्यक्ष
जयमंगल जाधव यांनी दिली.
पत्रकार परिषेदेला समितीचे सदस्य श्री नितिन अग्रवाल, श्री मनोहर खाकरे , श्री प्रशांत नवगिरे , श्री बालाजी वाघ तसेच रा. स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह श्री राजेंद्र कळकटे
उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here