आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते मयूरनगर येथे सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे भूमिपूजन

0
26
Ambadas Danve

संभाजीनगर शहरातील मयूर नगर प्रभागातील गजानननगर येथील श्री नीलेश जोशी यांचे घर ते एन ११ येथील भाजी मंडई पर्यंतच्या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर शहर प्रमुख बाळासाहेब थोरात विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, उपशहरप्रमुख गणपत खरात संदेश कवडे मनोज मेठी रमेश इधाटे ज्ञानेश्वर शेळके महिला आघाडी जिल्हा संघटक सुनिता देव उपजिल्हा संघटन प्रतिभा जगताप माजी नगरसेविका सीमाताई खरात स्वाती नागरे संगीता कृष्णा बोरसे वंदना विधाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने नगरविकास खात्यामार्फत महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी या योजनेअंतर्गत २५ लक्ष रुपये खर्चून हा रस्ता तयार करण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे येथील नागरिकांना येण्या जाण्यासाठी वाहतुकीसाठी त्रास सहन करावा लागत होता बऱ्याच दिवसापासून मयुर नगर सुदर्शन नगर या भागातील नागरिकांची हा रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी मागणी होती आमदार अंबादास दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने या रस्त्याच्या कामाची सुरुवात झाल्यामुळे येथील नागरिकांनी आभार व्यक्त करत आमदार अंबादास दानवे यांचा नागरी सत्कारही केला

यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे म्हणाले की सुपर संभाजीनगर संकल्पना घेऊन मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कोविड काळातही दर्जेदार तसेच उच्च प्रतीचे विकासात्मक कामे आपण वेगाने करत शहराचा कायापालट करत आहोत. संभाजीनगरकरांना जागतिक स्तरावरील उच्च दर्जाचे मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून जीवनमान उंचावण्याचे आमचे ध्येय आहे. हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात असतानांच विकासात्मक दृष्टिकोनातून शहराची सुपर संभाजीनगर कडे घोडदौड सुरू असून शिवसेना जनतेसाठी काम करते नागरिकांनीही शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन आमदार दानवे यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here