शिवगान राज्यस्तरीय स्पर्धेत जालन्याची बाजी

0
26
Aashlesha kulkarni


जालना, प्रतिनिधीः
भाजप सांस्कृतिक प्रदेश प्रकोष्ठच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शिवगान स्पर्धेत जालन्याच्या आश्‍लेषा कुलकर्णी हिने वैयक्‍तिक प्रकारात तृतीय क्रमांक पटकाविला. 11 हजारांचे बक्षीस पटकावत तिने राज्यस्तरावर जालन्याचे नाव कोरले. 19 फेब्रुवारी रोजी सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा गडावर राज्यस्तरीय शिवगान स्पर्धा उत्साही वातावरणात पार पडली. खा. उदयनराजे भोसले, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
शिवगान स्पर्धेची जिल्हास्तरीय फेरी 9 फेब्रुवारी रोजी जालना येथे पार पडली. यातील सांघिक व वैयक्‍तिक गटातील विजेते राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. 19 फेब्रुवारी रोजी अजिंक्यतारा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून स्पर्धा सुरू झाली. जालनाच्या सांघिक गटाने पोवाड्याचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळविली. तर वैयक्‍तिक प्रकारात आश्‍लेषा कुलकर्णी हिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्तुतीपर गायलेल्या गीतास तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले.शिवगान स्पर्धेत मिळालेल्या यशामुळे जालन्याचे नाव राज्यस्तरावर पोहचले. भाजप सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्षा शुभांगी देशपांडे म्हणाल्या की, प्राथमिक फेरीनंतर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जालन्याचा संघ पात्र ठरला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या शिवगान स्पर्धेत स्पर्धकांनी दामदार कामागिरी करीत जिल्ह्याचा गड राखला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित स्पर्धेमुळे विजेत्यांनी महाराजांना आगळेवेगळे अभिवादन केले. यशस्वी स्पर्धकांचे केंद्रीय राज्यमंत्री खा. रावसाहेब दानवे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आ. संतोष दानवे, माजी आ. विलास खरात, सांस्कृतिक सेलचे प्रदेश संयोजक अ‍ॅड.शैलेश गोजमगुंडे, मराठवाडा संयोजक निनाद खोचे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, भाजप जिल्हा संघटक, सिद्धीविनायक मुळे, सांस्कृतिक सेल जिल्हा संयोजक शुभांगी देशपांडे, नगरसवेक अशोक पांगारकर, तुलजेश चौधरी, नगरसेविका संध्या देठे यांच्यासह इतरांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here