कोकण भवनात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी

0
30
Balshashri jabhekar


नवीमुंबई दि. २०– दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आज कोकण भवन येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
आद्य पत्रकार, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा राज्य सरकारने थोर पुरूषांच्या यादीत समावेश केला आहे. 20 फेब्रुवारी 2021 रोजी बाळशास्त्री जांभेकरांची 209 वी जयंती प्रथमच राज्यभर शासकीय स्तरावर साजरी केली जात आहे. बाळशास्त्री जांभेकरांचा थोर व्यक्तीच्या यादीत समावेश करून त्यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्यभरातील सर्व मराठी पत्रकार संघटनांनी शासनाला धन्यवाद दिले आहेत. बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मतारीख कोणती याबद्दल विविध मतप्रवाह होते. 11 फेब्रुवारी रोजी शासनाने शुध्दीपत्रक काढून 20 फेब्रुवारी रोजी शासकीय, निमशासकीय कार्यालयात बाळशास्त्रींची जयंती साजरी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे यंदा प्रथमच राज्यात शासकीयस्तरावर बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी होत आहे.
यावेळी श्रीमती माधुरी डोंगरे नायब तहसीलदार कोकण विभाग तसेच कोकण भवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here