राजधानीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

0
26
Shivajimaharaj

नवी दिल्ली दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराजांची 391 वी जयंती आज महाराष्ट्र सदन आणि संसद भवनात उत्साहात साजरी करण्यात आली.

येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात युवोराज शहाजीराजे छत्रपती यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त श्यामलाल गोयल, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी कर्मचा-यांनी तसेच दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने महाराष्ट्र सदनात आज शिवजयंती सोहळयाचे आयोजन करण्यात आले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत व साधेपणाने पण उत्साहात हा सोहळा पार पडला. महाराष्ट्र सदनाच्या मुख्य लॉबीमध्ये युवोराज शहाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेऊन शिवजन्माचा पाळणा केला.

संसद भवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

तत्पूर्वी, सकाळी संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळयाशेजारी आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. यावेळी खासदार सर्वश्री राहुल शेवाळे, हेमंत गोडसे यांच्यासह युवोराज शहाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here