चित बहुजन आघाडी मराठवाडयातील आगामी नगर परिषद निवडणुकां स्वबळावर लढणार- अशोक हिंगे

0
35
Ashok Hinge


जालना: वाढती महागाई, पेट्रोल दरवाढ, रोजगाराचे प्रश्न या सोबत स्थानिक वीज , रस्ते व आरोग्य विषयक मुद्दे घेऊन वंचित बहुजन आघाडी मराठवाडयातील आगामी नगर परिषद निवडणुकां स्वबळावर लढणार असल्याचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी सांगितले. वंचित च्या मराठवाडा विभागीय व जिल्हा कार्यकारिणीची बैठक शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी पक्ष संघटना बांधणी संदर्भात समन्वय साधण्यासाठी मराठवाडा विभागीत जिल्हा निहाय निरिक्षक देण्यात यावेत. तसेच पक्षाच्या वतीने सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर जन आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष दिपक डोके, अँड. अशोक खरात, केशव मुद्देवाड, संतोष सुर्यवंशी, रमेश गायकवाड,डॉ.धर्मराज चव्हाण, प्रा.डॉ.सुरेश शेळके, जितेंद्र शिरसाट आदी मराठवाडा विभागीय कार्यकारिणी प्रमुख उपस्थित होते.यावेळी जालना जिल्हा पुर्व व पश्चिम कार्यकारिणीच्या स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष भालचंद्र भोजने, डेव्हिड घुमारे यांच्यासह अँड.हर्षवर्धन प्रधान, दिपक घोरपडे, विष्णु खरात, चंद्रकांत कारके, सतीश खरात, अकबर इनामदार, अँड.कैलास रत्नपारखे, शेख लालाभाई, खालेद चाऊस, विनोद दांडगे,प्रा.संतोष आढाव, डॉ.किशोर त्रिभुवन, विजय लहाने,अचित पाईकराव, सचिन कांबळे, कैलास रत्नपारखे, सुधीर शरनागत,रतन शिरसाट, राजेंद्र वांझोळे, गौतम खरात, जितेंद्र चव्हाण, नितीन बाळराज, विलास नरवडे, अमोल लोखंडे,सुरज सोनवणे,हरिष बोर्डे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here