कोरोनाला रोखण्यासाठी जनतेनी काळजी घ्यावी- विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर

0
28
Divisional Commissioner Sunil Kendrakar


हिंगोली, दि. 05 : कोरोनाच्या प्रादुर्भावाची सुरुवात झाल्यापासून हिंगोली जिल्ह्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत खूप चांगले काम केले असून हिंगोलीकरांनी देखील प्रशासनास खूप सहकार्य केले. परंतु सध्या कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेनी स्वत:ची व इतरांची काळजी घेण्याचे आवाहन विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी आज येथे केले.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयास विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी धनवंत माळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी रुग्णालयाच्या कामकाजाची पाहणी केली व व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांना योग्य प्रकारे आरोग्य सुविधा मिळत असल्याने समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी हिंगोली येथील सुशोभिकरण करण्यात आलेल्या रामलीला मैदानाची विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी भेट देऊन पहाणी केली. मैदानाचे सपाटीकरण, चोहोबाजूने वृक्ष लागवड व इतर कामकाज पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here