काकासाहेब घुले, दत्ता पाटील घुले, विष्णु श्रीरसागर यांच्यासह अनेक शिवसैनिकाचा काँग्रेस मध्ये जाहिर प्रवेश

0
22
Kaka saheb Ghule


जालना दि. 16(प्रतिनिधी) जालना विधानसभा मतदार संघाचे विकासोभिमुख नेतृत्व आ. कैलास गोरंटयाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कडवंची परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती श्री. विष्णू बापू क्षीरसागर व वखारी येथील कट्टर शिवसैनिक दत्ता पाटील घुले, व काकासाहेब घुले यांच्या सह असंख्य शिवसैनिक तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटीच्या काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
गेल्या अनेक वर्षा पासुन शिवसेनेत निष्ठावत शिवसैनिक म्हणुन काम करत असलेले ग्रामपंचायत निवडणुक पॅनल प्रमुख दत्ता पाटील घुले, वखारी ग्रामपंचायत सरपंच सौ. सत्यभामा काकासाहेब घुले पाटील, उपसरपंच सौ. ऊषा गजानन घुले पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती मथुराबाई दलसिंग जाधव, संदीप रामप्रसाद बोरूडे, विष्णू आसाराम घुले, चेअरमन काकासाहेब घुले, वखारी वडगाव व्हा चेअरमन प्रल्हाद जाधव, सोसायटी सदस्य मुरली जाधव, रंगनाथराव घुले, सोपानराव घुले, अर्जुन घुले, प्रभाकर घुले, बंडू पवार, दादाराव भालमोडे, भरत घुले, सोपान घुले, हरिचंद घुले, गजानन घुले, रघुनाथ घुले, उत्तम घुले, ज्ञानेश्वर घुले, योगेश घुले गोपीनाथ आटोळे, विनायक पवार, लक्ष्मण राठोड, विनायक राठोड, रोहिदास पवार, देविदास पवार, नरसिंग जाधव, दुर्गेश जाधव, बाबुराव जाधव, जनार्धन बोरुडे, दादाराव बोरुडे, तातेराव जाधव, देविदास बोरुडे, सिद्धेश्वर बोरुडे, सिद्धेश्वर घुले, प्रल्हाद घुले, दामोदर घुले आदी शिवसैनिकानी आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवुन काल शनिवारी काँग्रेस पक्षात जाहिर प्र्रवेश केला. काँग्रेस पक्षात नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्योवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही अशी ग्वाही देवुन गावाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्द करुन देण्यात येईल असे आ. गोरंट्याल यांनी या वेळी बोलतांना सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here