जुन्या वाहनांना आग लागून मोठे नुकसान

0
26
Old Car


जालना जुन्या कदीम जालना पोलिस ठाण्यात अपघात ग्रस्त उभा करण्यात आलेल्या आहेत. या वाहनांना गुरुवारी दुपारी अचानक आग लागून नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. जुन्या कदीम जालना पोलिस ठाण्याच्या आवारात अपघातात अथवा चोरीच्या करण्यात आलेली शेकडो वाहने उभी करण्यात आलेली आहेत. सदर वाहनांचा निकाल न्यायालयात प्रलंबित असल्याने गेल्या अनेक वर्षात ही वाहने उभी आहेत. गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास सदर प्रकार घडला. या वाहनांना आग कशामुळे लागली अद्याप माहिती मिळू शकली नाही. दरम्यान पोलीस ठाण्याच्या भिंतीलगत असलेला कचरा कोणीतरी पेटवून दिल्याने सदर आग लागली असावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here