जिल्हयात सामाजिक न्याय विभागाच्या विविध शासकीय योजनेच्या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

0
23
Vijaykumar Dhage

लातूर,:-माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,लातूरच्या वतीने जिल्हयात चित्ररथ व एलईडी व्हॅनव्दारे 120 गावात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनेच्या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्या हस्ते हरी झेंडी दाखवून करण्यात आला.
नवीन जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात या आयोजित कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.पडदुणे, विभागीय माहिती कार्यालयाचे लेखापाल अशोक माळगे, जिल्हा माहिती कार्यालयाचे लिपिक दिलीप वाठोरे उपस्थित होते.
जिल्हयात चित्ररथ व्दारे 80 तर एलईडी व्हॅनव्दारे 40 अशा एकूण 120 गावांत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनेच्या जनजागृतीचा कार्यक्रम तालुकानिहाय पूढील प्रमाणे आहे. चित्ररथ लातूर :-रामेश्वर, भातांगळी, आर्वी, गंगापूर, हरंगूळ (बु.), बोपला, जवळा (बु) एकुरगा, निवळी. औसा :-कारला,बोरगाव (बु.) उटी (बु) दावतपूर,तावशी ताड, लिंबाळा दाऊ, गुबाळ, उजनी,माळकोंडजी, टाका, मातोळा, लामजना, आशिव,किल्लारी बेलकुंङ निलंगा :-अन्सारवाडा,गौर,हंद्राळ,ताडमुगळी, औरादशहाजानी,अंबुलगा (बु)निटूर, पानचिंचोली,कासारशिरसी. शिरुर अनंतपाळ :- साकोळ, धामनगाव, लक्कडजवळगा, अंकुलगा, दैठणा, भिंगोली, डिगोळ उदगीर :-वायगाव,करडखेड,तोंडार,चांदेगाव,चिमाची वाडी, हंडरगुळी.
चाकूर:- म्हाळंगी, घरणी, नळेगाव, वडवळ नायगाव, कबनसांगवी, नोगशवाडी, अहमदपूर:-कोपरा, टाकळगांव (का) सावरगाव रोकडा, हडोळती, शिरुरताजबंद, किनगाव.रेणापूर :- सांगवी,पानगाव,खरोळा, कोरेपूर,पोहरेगाव,कोष्टगांव, देवणी :-वलांडी, इस्माईलवाडी,जवळगा,डोंगरवाडी,संगम,विलेगाव,सावरगाव,अचवला व जळकोट:- जळकोट, अतनुर,वंजारवाडा,गुट्टी,घोणसी, धामनगाव,रावणकोला,पाटोदा या गावचा समावेश आहे.
LED व्हॅन :- लातूर :-रामेश्वर,करकट्टा,जेवळी, गुंफावाडी, औसा:- कारला, मासुर्डी, सिंदाळावाडी, नागरसोगा, निलंगा :-अन्सरवाडा,सरवडी,डांगेवाडी, टाकळी, शिरुरु अनंतपाळ:- साकोळ, टेंभूर्णी, सोरा, कानेगाव, उदगीर :- वायगाव, लोणी, डोंगरशेळकी, भाकसखेडा, चाकूर:- म्हाळंगी, राचन्नावाडी, जगळपूर (खु) उजळंब, अहमदपूर:-कोपरा, टेंभूर्णी,सोरा, चिलखा, रेणापूर:-सांगवी, मोरवड, फावडेवाडी, पाथरवाडी, देवणी :- वलांडी, सिंधीकामठ, लासोना, भोपणी व जळकोट:- येलदरा, मरसांगवी, मेवापूर, शेलदरा या गावांचा समावेश आहे.
लातूर जिल्हयातील नागरिकांनी सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेतून चित्ररथ व एलईडी च्या माध्यमातून विविध योजनांची माहिती घेऊन या योजनाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी लातूर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here