मराठा क्रांती मोर्चा प्रणित शिवजन्मोत्सव समितीतर्फे शिवरायांच्या संगमरवरी मूर्तीची रथातून मिरवणूक

0
24
Marathi Kranti Morchaजालना/प्रतिनिधी
मराठा क्रांती मोर्चा प्रणित शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने शुक्रवारी (दि.१९) छत्रपती संभाजी उद्यान येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संगमरवरी मूर्तीची सजविलेल्या रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजीमंत्री अर्जुनराव खोतकर, आ. कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. तद्नंतर सजविलेल्या रथात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची वाद्यवृंदाच्या गजरात मिरवणूक निघाली. यावेळी ‘जय भवानी जय शिवराय’, ‘तुमचं आमचं नात काय जय भवानी जय शिवराय’ अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. शिवप्रेमी युवकांचा सळसळता उत्साह या मिरवणूकीत दिसून आला. छत्रपती संभाजी उद्यान येथून निघालेली ही मिरवणूक शिवरायांचा नामघोष करीत गांधी चमन, मस्तगड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्याजवळ विसावली. याठिकाणी शेकडो शिवभक्तांनी अभिवादानासाठी गर्दी केली होती. मंत्रोच्चारात यावेळी महाराजांचा दूग्धाभिषेक करण्यात येवून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्षशेख इब्राहिम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमास अभिमन्यू खोतकर, अक्षय गोरंट्याल, ॲड. दीपक कोल्हे, संतोष गाजरे, अरविंद देशमुख, ज्ञानेश्वर ढोबळे, जगन्नाथ काकडे, महेश निकम, सचिन कचरे, धनसिंग सूर्यवंशी, विक्की हिवाळे, गणेश धायडे, आकाश ढेंगळे, करण जाधव, शुभम टेकाळे, पृथ्वीराज भुतेकर, गोपाल चित्राल, आकाश जगताप, मिलिंद गंगाधरे, योगेश पाटील, प्रा. नरसिंग पवार, रमेश गजर, चंद्रकांत भोसले, अर्जुन पाथरकर, प्रभाकर केदारे, अमित कुलकर्णी, दत्ता लहाने, अंकुश देशमुख, अमोल चिखले, किसन परळकर, प्रशांत लहाने आदींची उपस्थिती होती.
डिजिटल प्रतिमा, गडकोटाचा देखावा ठरले लक्ष्यवेधी
मराठा क्रांती मोर्चा प्रणित शिव जन्मोत्सव समितीने यंदा प्रथमच महाराजांची डिजिटल प्रतिमा गांधी चमन येथे उभारली होती. याच ठिकाणी गडकोटांचा माहिती देणारी प्रदर्शनी भरवण्यात आली होती. शेकडो शिवप्रेमींनी याठिकाणी भेटी देवून या स्तुत्य उपक्रमाचे कौतूक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here