मंत्री संजय राठोड यांनी सर्व आरोप फेटाळले

0
35
Sanjay Rathod


वाशिम दि.२३: पूजा मृत्यू प्रकरणात जे आरोप करण्यात येत आहेत, ते चुकीचे असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. पोहरा देवीचे दर्शन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगून ते फेटाळून लावले.
पूजा चव्हाणचा मृत्यू दुर्दैवी आहे. पूजाच्या मृत्यूबद्दल बंजारा समाजाला अतिव दु:ख आहे. मी व संपूर्ण समाज चव्हाण कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत. पूजा चव्हाण मृत्यूवरून काही लोकांकडून गलिच्छ राजकारण केलं जात आहे. मी त्याचा निषेध करतो. माझ्यावरील करण्यात आलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे. चौकशीत सर्व गोष्टी स्पष्ट होतील आणि पोलीस तपासातून सत्य बाहेर येईल. माझे आयुष्य उद्ध्वस्थ करण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
समाजमाध्यमातून जे दाखवले त्यात सत्य नाही मी 15 दिवस नाही, 10 दिवस नव्हतो मी 10 दिवस कुटुंब सांभाळत होतो. दरम्यान, मुंबईच्या घरातून शासकीय कामकाज देखील सुरू होते. ‘माझी, कुटुंबाची आणि समाजाची बदनामी थांबवा. असे बोलून वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here