मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना युरोपमध्ये ‘इंटर्नशिप’ करण्याची संधी

0
26
Satish Chavan


औरंगाबाद – मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना युरोपियन देशात विविध क्षेत्रात ‘इंटर्नशिप’ करण्याची सुवर्ण संधी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी महाविद्यालयात ‘सेंटर फॉर युरोपियन स्टडीज’ विभाग सुरू करण्यात आला असून संस्थेचे सरचिटणीस आ.सतीश चव्हाण यांच्याहस्ते शुक्रवारी (दि.19) या विभागाचे उद्‌घाटन करण्यात आले.
म.शि.प्र.मंडळाचे देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय विविध अभिनव व उपक्रमशील प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देत आले आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना युरोपमध्ये ‘इंटर्नशिप’ करता यावी यासाठी जागतिक स्तरावरील जवळपास 160 देशांमध्ये ‘युथ डेव्हलपमेंट’ कार्यक्रम राबवणार्‍या ‘एज्युकेरॉन इंटरनॅशनल’ व देविगरी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात शुक्रवारी शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. ‘सेंटर फॉर युरोपियन स्टडीज’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल रिसर्च प्रोजेक्ट, इंटर्नशिप समर स्कूल, आंतरराष्ट्रीय औद्योगिक शिक्षण, जागतिक युवा देवाण घेवाण कार्यक्रम, नवीन औद्योगिक संधी, पदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व आंतरराष्ट्रीय संशोधनासाठी संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे महाविद्यालयाचे संचालक डॉ.उल्हास शिऊरकर यांनी सांगितले. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बाहेरील देशात शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार असून आपल्या क्षेत्रात नाविण्यपूर्ण संशोधन करून भविष्य घडू पाहणार्‍या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.सतीश चव्हाण यांनी उद्‌घाटन प्रसंगी केले. यावेळी मशिप्र मंडळाचे उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद, एज्युकेरॉन इंटरनॅशनलचे संस्थापक केरॉन वैष्णव यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. हा सामंजस्य करार करण्यासाठी डॉ.गजेंद्र गंधे, प्रा.संजय कल्याणकर यांनी परिश्रम घेतले.
मशिप्र मंडळाचे अध्यक्ष आ.प्रकाश सोळुंके, कार्यकारणी सदस्य विवेक भोसेल, स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य विश्वास येळीकर, यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. विभाग प्रमुख डॉ.सत्यवान धोंडगे, प्रा.प्रकाश तौर, डॉ.राजेश औटी, डॉ.सुनील शिंदे, प्रा.रूपेश रेब्बा, अच्युत भोसले आदींची यावेळी उपस्थिती होती.

फोटो कॅप्शन- ‘एज्युकेरॉन इंटरनॅशनल’ व देविगरी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी आ.सतीश चव्हाण, शेख सलीम, डॉ.उल्हास शिऊरकर, केरॉन वैष्णव, डॉ.गजेंद्र गंधे आदी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here