उज्जैनपूरी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी संगीता वाघ

0
23

जालना,दि.१६ (प्रतिनिधी) नुकत्याच पार पडलेल्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणूकीमध्ये उज्जैनपूरी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी संगिता रामेश्‍वर वाघ यांची तर उपसरपंचपदी शेख फरजाना बी सरवर यांची निवड करण्यात आली आहे.
उजैनपूरी ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यासी अधिकारी म्हणून आर. डी. चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर ग्रामसेविका श्रीमती पी.एम. अंबुलगे यांनी त्यांना सहाय्य केले. या बैठकीस नवनिर्वाचित सरपंच सौ. संगिता रामेश्‍वर वाघ व उपसरपंच श्रीमती फरजाना बी सरवर यांची निवड करण्यात येत असल्याचे अध्यासी अधिकार्‍यांनी जाहीर केले. या बैठकीस अंजनाबाई अंबादास सोरमारे, पार्वता तुळजीराम सोरमारे, शेख फरजाना बी. सरवर, भिका दादाराव जाधव, गयाबाई त्र्यंबक तोतरे, जयश्री रामेश्‍वर शिंदे, बाळासाहेब रंगनाथ खरात, गणेश अशोक पाटणकर, संगिता रामेश्‍वर वाघ आदींची उपस्थिती होती.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here