अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यासाठी अभ्यास करून तसेच आगामी काळातील कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ आ.सतीश चव्हाण यांच्या प्रश्नाला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे उत्तर

0
28
online-learning-e-learning-online-education-education-1
औरंगाबाद – औरंगाबाद शहरातील इयत्ता 11 वी ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यासाठी अभ्यास करून तसेच आगामी काळातील कोरोनाची परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेतला जाईल असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज (दि.4) विधान परिषदेत सांगितले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 11 वी ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यासंदर्भात सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.
इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अनेक त्रुटी असून विद्यार्थ्यांना शहरातील महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही तर महाविद्यालयांना देखील विद्यार्थी मिळत नाही. मागील चार वर्षांतील औरंगाबाद शहरातील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आकडेवारी पाहता 2017-18 मध्ये 50 टक्के, 18-19 मध्ये 51 टक्के, 19-20 मध्ये 60 टक्के तर 20-21 मध्ये 45 टक्के जागा रिक्त राहील्या असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. याउलट ग्रामीण भागामध्ये महाविद्यालयांची विद्यार्थी प्रवेश क्षमता कमी असून देखील त्याठिकाणी दुप्पट प्रवेश होत आहे. परिणामी शहरातील प्रवेश पूर्ण क्षमतेने न झाल्याने शिक्षक देखील अतिरिक्त होत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहात सांगितले. त्यामुळे औरंगाबाद शहरातील 11 वी ची ऑनलाईन प्रवेश प्रकि‘या रद्द करावी, ज्या महाविद्यालयांनी प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश दिला आहे अशा महाविद्यालयांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहात केली.
आ.सतीश चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी औरंगाबाद शहरातील इयत्ता 11 वी ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करावी यासाठी आ.सतीश चव्हाण माझ्याकडे मागील वर्षांपासून वेळोवेळी पाठपूरावा करीत आहेत. सभागृहातील आमदारांची भावना लक्षात घेता इयत्ता 11 वी ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यासाठी अभ्यास करून तसेच आगामी काळातील कोरोनाची परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेतला जाईल असे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री मा.ना.वर्षाताई गायकवाड यांनी सभागृहात सांगितले. या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ.विकम काळे, आ.अंबादास दानवे, आ.अभिजीत वंजारी आदींनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here