वैद्यकीय प्रतिनिधींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
23
Collector Nivedan


जालना: जिल्ह्यातील सर्व जवळपास 200 वैद्यकीय प्रतिनिधी दररोज जवळपास प्रत्येकी 10 डाक्टर व 10 मेडिकल यांच्या भेटी घेत असतो, तसेच प्रत्येक डॉक्टर कडे जो वेटिंग टाइम असतो त्यामद्ये आमचा संपर्क त्या हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णासोबत होत असतो, असा एका वैद्यकीय प्रतिनिधी चा संपर्क जवळपास 100 पेक्षा जास्त लोकांसोबत एक दिवसातून होतो वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, केमिस्ट व दवाखान्यात काम करणाऱ्या कामगारांनंतर आम्हाला सुद्धा सरकारने लस द्यायला हवी होती, पण सरकारने याकडे दुर्लक्ष केले, आमच्या संघटने द्वारे निवेदन देण्यात आल्यानंतर सुद्धा यावर कसलीही उपाययोजना केली नाही, एक वैद्यकीय प्रतिनिधी किती जणांना करोना संक्रमित करू शकेल हा विचार जर केला तर प्रशासनाची झोप उडल्याशिवाय राहणार नाही जालना शहरात तर रोज फिरणारे 200 वैद्यकीय प्रतिनिधी आहेत प्रशासनाने जर यांना विकत का होईना पण लस उपलब्ध करून द्यावी याकडे लक्ष वेधने आवश्यक आहे, आपण सर्व पत्रकार बंधुना विनंती की आपल्या वृत्तपत्रात सदर विषयावर बातमी छापून आणावी व आम्हला मदत करावी…… संदीप देशपांडे (वैद्यकीय प्रतिनिधी, जालना)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here