सामान्य माणसात आत्मविश्वास निर्माण करून स्वराज्य उभे केले-डॉ.विजय कुमठेकर

0
27
Shivaji Maharaj


जालना (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांनी देशात सगळीकडे अराजकता माजलेली असताना सामान्य माणसांना सोबत घेऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून बहुजनांचे, रयतेचे स्वराज्य उभे केले त्यामुळे स्वराज्यातील प्रत्येक माणूस मरायला आणि मारायला तयार झाला होता असे प्रतिपादन सिंधी पिंपळगाव येथे डॉ. विजय कुमठेकर यांनी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात क
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. आमदार अरविंद चव्हाण यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास अण्णा चव्हाण(जि.प.सदस्य ) हे होते यावेळी प्रमुख पाहुणे ह.भ.प पंडितराव महाराज ,राम गायकवाड ,पंडित लव्हटे, बबनराव सिरसाट, जनार्दन शिरसाट, विद्रोही कवी कैलास भाले यांची उपस्थिती होती विशेष अतिथी म्हणून गावचे सरपंच वैजनाथराव सिरसाट ,भास्करराव चव्हाण ,मधुकरराव चव्हाण, श्रीरंगराव चिंचपुरे ,राजाभाऊ सिरसाट ,सुरेश मुटकुळे, लक्ष्मणराव सिरसाट, ज्ञानेश्वर डिघे होते यावेळी नुकतेच भारतीय सैन्यदलातून आपल्या मातृभूमीची सेवा बजावून सेनेतून निवृत्त झालेले सैनिक श्री चंद्रकांत सिरसाट, साईनाथ क्षिरसागर, किशोर डिघे,यांना एकता शेतकरी कृषी विकास व बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने श्री.नवनाथ लोखंडे यांनी या भूमिपुत्राचा विशेष असा गौरव केला यावेळी त्यांना गौरव पत्र ,शाल ,पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाच्या सुरुवातीस माॅंसाहेब जिजाऊ ,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला . यावेळी अध्यक्षांचा सत्कार नवनाथ लोखंडे यांनी केला मा.आमदार अरविंद चव्हाण यांचा सत्कार वैजनाथराव सिरसाट यांनी केला कार्यक्रमाचे वक्ते डॉ. विजय कुमठेकर यांचा सत्कार अरविंद चव्हाण व बबनराव सिरसाट यांनी केला प्रमुख पाहुणे राम गायकवाड यांचा सत्कार भास्करराव चव्हाण ,पंडित लव्हटे यांचा सत्कार मधुकरराव चव्हाण, कवी कैलास भाले यांचा सत्कार सचिन सिरसाट ,ह.भ.प पंडितराव महाराज यांचा सत्कार राजाभाऊ सिरसाट यांनी केला यावेळी विचारपीठावर लिंबाजी क्षिरसागर,कल्याण चव्‍हाण, पोलीस पाटील जनार्दन सिरसाट, देविदास राव चव्हाण, दौलतराव डिघे,चितोडा गावचे सरपंच ज्ञानेश्वर माऊली डिघे ,आप्पासाहेब चिंचपुरे ,असोला गावचे सरपंच सुरेश मुटकुळे हे होते यांचाही सत्कार नानासाहेब जिगे ,बबनराव सिरसाट कडुबा लोखंडे यांनी केला
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राम गायकवाड ,पंडित लव्हटे, कैलास भाले यांचीही भाषणे झाली उद्घाटक पर भाषणात अरविंद चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे आपले खरे प्रेरणास्थान आहेत युवकांनी त्यांचे गुण घेतले पाहिजेत महिलांनी राजमाता जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या मुलांना तसेच घडवावे असे आवाहन केले
पुढे बोलताना डॉ. विजय कुमठेकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या आयुष्यात कधीही तळहातातील रेषेकडे पहात बसले नाहीत, आपल्यासोबत असंख्य बहुजनातील तरुणांना घेऊन नवे स्वप्न पाहिले व ते कृतीत आणले .जगात हजारो राजे होऊन गेले त्यांची कोणी जयंती साजरी सुद्धा करीत नाहीत त्यांची नावेही कोणाला माहीत नाहीत हा एकमेव असा राजे आहे ज्याच्या राजदरबारात आयुष्यामध्ये कधीच त्यांनी रम – रमा – रमी ला स्थान दिले नाही. सातत्याने त्यांनी शेतकऱ्यांच्या,सामान्य माणसांच्या जीवनात सुखलोलुपता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला.नवे कृषी धोरण आणले समाजातील अनिष्ठ रुढी परंपरेला मुठमाती दिली .आयुष्यात त्यांनी 290 लढाया खेळल्या सर्वात जास्त लढाया त्यांना स्वकियांच्याच विरोधात लढावे लागले.म्हणजेच 190 लढाया खेळाव्या लागल्या आहेत .दुर्दैव आपले असे आहे की, आपण भारतीय माणसं सातत्याने पराक्रमी माणसाचे पाय ओढण्याचे काम करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा तेच झाले स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतिहास घडविला मावळ्यांनी याच मावळ्यांचा इतिहास विकृत केला ज्याच्या हाती लेखणी होती त्या कावळ्यांनी , म्हणून इतिहासाचे आपण नीट वाचन केले पाहिजेत आपला वेळ पारायणे व अखंड हरिनाम सप्ताहात घालविण्यापेक्षा मुलांना सुसंस्कारित करा, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे व राम मंदिरास पैसा पुरवायचा असे अजिबात जमणार नाही कारण छत्रपतींनी आपल्या आयुष्यात जो काही पैसा कमविला धन-दौलत कमविले तो पैसा,ते धन कधीच मंदिरावर उधळली नाही यापेक्षा रयतेची त्यांनी काळजी घेतली .आपण गावागावात वाचनालय उभे करा मुलांची वैचारिक भूक भागवा.गावातुन एमपीएसी,युपीएससी केंद्रे निर्माण करा,नवे छत्रपतीशिक्षणातुन घडवा असे आवाहान केले.
यावेळी गावातील व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये देविदासराव चव्हाण, गुलाबराव चव्हाण ,रंगनाथ मोरझडे, नारायण सिरसाट,हिम्मतराव चव्हाण, कल्याण चव्हाण, बाबासाहेब चव्हाण, अंकुश चव्हाण, गजानन चव्हाण, शंकर सिरसाट ,प्रल्हाद सिरसाट त्याच बरोबर यावेळी महिलांची सुद्धा प्रचंड संख्या होती यामध्ये आशा लोखंडे, कडुबाई चव्हाण, गयाबाई चिंचपुरे, ठगुबाई चव्हाण ,सरसाबाई सिरसाट, शोभाबाई चव्हाण, गंगुबाई सिरसाट, लताबाई सिरसाट नंदा चव्हाण सूर्यकलाबाई सिरसाट कांताबाई सिरसाट ,मायावती लोखंडे, इत्यादींची उपस्थिती होती तसेच चितोडा, असोला या गावातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन,नियोजन श्री.नवनाथ लोखंडे व वैजनाथ सिरसाट यांनी केले.सूत्रसंचालन रामेश्वर पवार यांनी तर आभारप्रदर्शन कैलास चव्हाण यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here