गुदमरणार्‍या मनाला मिळाला मोकळा श्वास..! पाझर संस्था व मैत्र मांदियाळी जालना यांनी घेतला पुढाकार

0
27
Oxygen


जालना । प्रतिनिधी – गरजवंतांच्या मदतीला धावून जाणार्‍या जालन्यातील पाझर आणि मैत्र मांदियाळी या संस्थेने रामनगर भीमनगर परिसरात राहण्यार्‍या एका आजारी महिलेला इळरिि मशीन लावून दिले. सदरील महिलेस श्वसनाचा आजार आहे. या महिलेला ऑक्सिजनची आवश्यकता होती. ती गरज पाझर आणि मैत्र मांदियाळी संस्थेने पूर करत गुदमरणार्‍या मनाला मोकळा श्वास मिळवून दिला.
भीमनगर येथील महिलेस श्वसनाचा आजार आहे. दर तीन दिवसाला या महिलेला एक ऑक्सिजन सिलेंडर लागतो. मागील मार्च 2020 पासून या संस्थेकडून सिलेंडर पुरविल्या जात असत. मात्र, महिलेचा आजार हा दुसर्‍या स्टेजला आहे व केवळ ऑक्सिजन सिलेंडर वाटे श्वास घेणे अवघड झाले होते. शिवाय दर तीन दिवसाला सिलेंडरची ने-आण करणे कसरतीसह खर्चिक होते. यासाठी संस्थेच्यावतीने डॉ. हुसे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सदर महिलेला इळरिि मशीन लावावे लागेल असे सांगितले. यावर पाझर आणि मैत्र मांदियाळी संस्थेच्यावतीने मदतीचे आवाहन करण्यात आले यावर अवघ्या तासाभरातच संस्थेकडून महिलेस मशिन लावण्यात आले. मदतीचे आवाहन केल्यानंतर दात्यांनी स्वयंस्फुुर्तीने मदत करण्यास सुरुवात केेली होती.
मशिन लावल्यानंतर महिलेच्या डोळ्यात आनंद आणि समाधानाचे भाव स्पष्ट दिसत होते. मशिन लावल्यानंतर अर्धा तास महिलेच्या देखरेखीसाठी संस्थेची टिम तेथेच थांबली होती. महत्त्वाचे म्हणजे या महिलेच्या कुटूंबात कर्ता कुणीही नूसन महिलेला एक मुलगी आहे.
या गरजू परिवारासाठी अजय किंगरे, केतन घनघाव, नविन वलकट्टी, शिवप्रसाद केवट, निखील वीर, कांतीलाल हिवाळे, कैलास अंकुशकर, सुनील वाघमारे, नितीन गुर्रप, आनंद कासलीवाल आदींनी मदत केली. पाझर आणि मैत्र मांदियाळी संस्थेच्यावतीने मदत करणार्‍या दात्यांचे आभार मानण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here