आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा..! वेदमंत्रोच्चारात छत्रपती शिवरायांचा दुग्धाभिषेक

0
28
Shivaji Maharaj


जालना ( प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ,विश्ववंदनीय, क्षत्रियकुलवंत, कुळवाडीभूषण, छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती शुक्रवारी (ता.१९) जालना शहरासह जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली. शिवछत्रपती सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचलित जयंती उत्सव समितीच्या वतीने नवीन जालना भागातील महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोर वेदमंत्रोच्चारात , छत्रपती शिवरायांचा विधीवत दुग्धाभिषेक करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय,,,,,,। जय भवानी,,,,जय शिवाजी,,,,हर $$ हर$$ महादेव,,,जय जिजाऊ,,जय शिवराय,,,!अशा गगनभेदी घोषणा देत शिवप्रेमींनी संपूर्ण आसमंत दणाणून सोडला.

दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात व जल्लोषात साजऱ्या होत असलेल्या शिवजन्मोत्सवावर यंदा कोरोना संसर्गाचे सावट असल्याने सार्वजनिक मिरवणूक रद्द करण्यात आली. त्याऐवजी रुग्णांना फळ वाटप, गोशाळेत चारा व गरजवंत महिलांना साड्यांचे वाटप असे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. शिव जन्मोत्सवानिमित्त शुक्रवारी सकाळपासूनच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर येऊन शिवप्रेमींनी आपल्या सोयीनुसार महाराजांचे दर्शन घेतले .तर उत्सव समितीच्या वतीने महाराजांच्या मूर्तीचा विधीवत दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी अंकुशराव देशमुख, अंकुशराव राऊत, आर .आर. खडके,विजयकुमार पंडित, ज्ञानदेव पायगव्हाणे,विश्वासराव भवर,अशोकराव आगलावे, श्री.शिर्के, समितीचे अध्यक्ष रवींद्र राऊत, कार्याध्यक्ष सुभाष देवीदान, सचिव ॲड. रवींद्र डुरे ,कोषाध्यक्ष सतीश जाधव ,उपाध्यक्ष विमलताई आगलावे, क्रांतीताई खंबायत कर ,शितल ताई तनपुरे, सुवर्णा राऊत, विभावरी ताकट ,गणेश सुपारकर, सागर देवकर ,तय्यब देशमुख, प्रकाश जगताप ,संजय देठे ,राजेंद्र गोरे, प्रशांत गाढे,शिवाजीराव तनपुरे, दिगंबर राव पेरे, सुरेश गाजरे, संतोष गाजरे ,विजय वाढेकर, भरत मानकर, विलास तिकांडे,प्रवीण बावणे,गजानन लाखोले,इंजि. भुरेवाल, घनश्याम बिर्ला, सुशील शिंदे ,मुन्ना गजभिये ,रवी खांडेकर यांच्यासह उत्सव समितीचे पदाधिकारी सदस्य व शिवप्रेमींची उपस्थिती होती. पुतळा परिसरात नगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्वच्छता ठेवून कारंजे सुरू करण्यात आल्याने शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केले. दरम्यान दिवसभर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर शिवप्रेमींनी येऊन जयंतीनिमित्त अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here