परभणीत दोन गावठी पिस्टल,13 जीवंत काडतूसासह गांजा चरस जप्त

0
24

परभणी (दि.23):
येथील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत साकला भागात पोसिसांच्या एका पथकाने छापा टाकून दोन गावठी पिस्टल, 13 जीवंत काडतूस तसेच चरस व गांजाचा मोठा साठा मंगळवारी (दि.23) जप्त केला.
साकलाप्लॉट भागातील रेल्वे गेटजवळ शेख सोनू उर्फ शेख अमीर शेख ताहेर हा चरस, गांजा व अन्य घातक पदार्थांची विक्री करत आहे. तो सोबत बंदूक (पिस्टल) वापरतो. शहरातील काही गुंड टोळ्यांना शस्त्र आणून विकत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यापाठोपाठ सहाय्यक पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह एका पथकाने अड्ड्यावर छापा टाकला. झडती घेतली. तेव्हा पंचासमक्ष या आरोपींकडून 60 हजार रुपये किंमतीचे 111 ग्रॅम चरस, 500 ग्रॅम गांजा अंदाजे किंमत पाच हजार रुपये. तसेच चारचाकी वाहनातून एक पिस्टल, 13 जीवंत काडतूस तसेच त्याच्या बुलेट गाडीच्या डिक्कीतून एक गावठी पिस्टल जप्त केले. या कारवाईत तीन आरोपींकडून एकूण सहा लाख 41 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सहाय्यक पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यकटेश्वर आलेवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक गुलाब बाचेवाड, फौजदार चंद्रकांत पवार, फौजदार संतोष शिरसेवाड, फौजदार विश्वास खोले, फौजदार साईनाथ पुयड, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, हनुमंत जक्केवाड, निलेश भुजबळ, मधुकर चट्टे, बालासाहेब तुपसुंदरे, बबन शिंदे, शंकर गायकवाड, अजहर पटेल, हरिश्चंद्र खुपसे, दिलावर खान पठाण, दीपक मुदीराज, यशवंत वाघमारे, सय्यद मोबीन, शेख अजहर जाफर, संतोष सानप, संजय घुगे, छगन सोनवणे, अरुण कांबळे, विष्णू भिसे, श्रीमती आशा सावंत, उमा पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here