
मोबाईलचा अतिवापर घातकः डॉ. आंबेकर
जालना प्रतिनिधी:
मोबाईलचा अतिवापर आपल्या शारीरिक, सामाजिक व मानसिक आरोग्यास घातक ठरत असल्याचे डॉ. प्रकाश आंबेकर यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ जालना तर्फे शहरातील हॉटेल मधुबन सभागृहात आयोजित आरोग्य मित्र प्रशिक्षण कार्यशाळेत म ोबाईलचा वापर व मानसिक आरोग्य या विषयावर ते बोलत होते.