मंठ्याच्या लेकीची राज्यस्तरीय भरारी; पूजा बनसोडे यांच्या यशाने तालुक्याची मान उंचावली!

मंठ्याच्या पूजा बनसोडेंची MPSC मध्ये राज्यात मुलींमधून प्रथम क्रमांकाची दमदार कामगिरी..

Jalna Nayak    16-Aug-2026
Total Views |

मंठ्याच्या पूजा बनसोडेंची MPSC मध्ये राज्यात मुलींमधून प्रथम क्रमांकाची दमदार कामगिरी..
मंठा : मंठा तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मंठा येथील पूजा दशरथ बनसोडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत महाराष्ट्रात मुलींमधून प्रथम क्रमांक पटकावल्याची माहिती समोर आली आहे.पूजा बनसोडे यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर एकाच वेळी दुय्यम निबंधक वर्ग-१, सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्यकर निरीक्षक या तीन महत्त्वाच्या पदांना गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशामुळे मंठा तालुक्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उज्ज्वल झाले आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पूजा बनसोडे यांचे यश प्रेरणादायी ठरले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कठोर परिश्रम, योग्य नियोजन आणि ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येते, हे त्यांनी आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे.पूजा बनसोडे यांच्या या अभिमानास्पद यशाबद्दल मंठा तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, कुटुंबीय, मित्रपरिवार, शिक्षक तसेच नागरिकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.