जालना : ओबीसी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे यांनी पुणे येथे मराठा समाजाच्या महिलेबद्दल कथितरित्या अपशब्दाचा वापर केल्याचा आरोप करत जालन्यात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक बनला असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी सोमवार दि. 17 ऑगस्ट रोजी कदीम जालना पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेत उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी पोलीस निरीक्षक जनार्धन शेवाळे यांना सूचना सूचना केल्यानंतर मराठा मोर्चा समन्वयक व संभाजी ब्रिगेड महीला आघाडीच्या जालना शहराध्यक्षा सुवर्णाताई वाघ (राऊत) यांच्या तक्रारीवरून नवनाथ वाघमारे यांच्याविरुद्ध भादंवि 79, 196(1), 353 (2), 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ॲड. शैलेश देशमुख हे कायदेशीर भूमिका मांडत आहेत.
यावेळी आंदोलकांनी नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध करत संबंधित प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे अशोक पडुळ, संतोष गाजरे, संदीप ताडगे, विश्वंभर तिरुखे, प्रशांत वाडेकर, नगरसेवक महेश निकम, ॲड. शैलेश देशमुख, गणेश शिंदे, प्रल्हाद शिरसाट, संध्याताई देठे, सुवर्णताई वाघ, नीता वझरकर, सीमाताई काकडे, शरद मांगधरे, योगेश शिंदे, विकास शिंदे, शरद शिंदे, भरत मानकर, परमेश्वर सपकाळ, गजानन देशमुख, पंकज बागल, विलास भालेकर, बाबा राऊत, सचिन नाईकवाडे, योगेश पाटील, पांडू पवार, श्रीकांत पवार, गणेश थोरात, नीता वझरकर, धनंजय पोहेकर, बाळासाहेब बरसाले यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.