जालना- दरवर्षी शालेय संस्कृत पाठांतर स्पर्धेतून संस्कृत भाषा व संस्कृती जपण्याचे कार्य श्रीराम संस्कृत विद्यालयाच्या माध्यमातून होत आहे असे प्रतिपादन श्रीराम संस्कृत विद्यालय (पाठशाळा),ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालय व अखिल भारतीय शालिवाहन संस्कृत प्रतिष्ठान,जालना यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत दिनानिमित्ताने दिनांक -१७/०८/२०२६ रोजी आयोजित शालेय संस्कृत पाठांतर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जालना शहर महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश राऊत यांनी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जे.ई.एस.महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश अग्निहोत्री यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालयाचे अध्यक्ष कैलास बियाणी,सचिव श्रीकांत शेलगावकर,स्पर्धा परीक्षक जयश्री कुलकर्णी व पद्मिनी कुलकर्णी यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीचे पूजन करण्यात आले व दीपप्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
राजेश राऊत म्हणाले की, शेलगांवकर अणि आमचे पारिवारीक संबंध असून त्यातून एकमेकांना सहकार्य करत असतो. चांगले व सुंदर पाठांतर पाहूण त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना गणेश अग्निहोत्री म्हणाले की, संस्थेचे कार्य पाहूण संस्थेसोबतचा स्नेह यापूढे कायम राहिल. लहानमुलांचे पाठांतर पाहूण मला माझे बालपण आठवले. ज्या विद्यार्थ्यांना बी.एस.सी. (कम्प्यूटर सायन्स), बी.ई. (कम्प्यूटर सायन्स), आय.टी. किंवा ए.आय.चा अभ्यास करायचा आहे त्यांनी संस्कृत भाषा शिकावी. विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच संस्कृत भाषेचे अध्ययन करावे कारण संस्कृत भाषा ही सर्वांगावर कार्य करते. संस्कृत भाषेसाठी मागील पंच्याहत्तर वर्षापासून संस्थेतर्फे सुरु असलेल्या यज्ञाचे त्यांनी कौतूक केले, जर्मनीमध्ये सायको निरो लिग्वेस्टीक या आधुनिक विषयावरील संशोधनात सुध्दा संस्कृत भाषेचा उपयोग होत आहे. विद्यार्थ्यांना मुख्य संस्कृत विषय देऊन गणित, विज्ञान इतर भाषा यांचे ज्ञान दिल्या जाऊ शकत म्हणजे संस्कृतवर चांगले काम होईल. आता सध्या असलेले जास्तीत जास्त अॅप हे अलदीरीदम रायटिंगचा जो प्रकार आहे तो संस्कृतमध्ये खुप छान होतो.
२७ ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी या वर्गासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी एकूण ३०४ शालेय विद्यार्थांनी सहभाग नोंदवला आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाम शेलगावकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार पद्मिनी कुलकर्णी यांनी मानले. याप्रसंगी शालिवाहन संस्कृत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधाकर भालेराव,मनोहर कुलकर्णी,संदीप कुलकर्णी,योगेश कुलकर्णी,अमोल कुलकर्णी,प्रमोद बागडी,भाग्यश्री कुलकर्णी,कीर्ती पुराणिक,शैलेंद्र बदनापूरकर,शंकर देवावाले,महेश शेलगावकर,सोनाली दहिवाळ,दिपाली लताड,अनिता काळे,वंदना वाजे,सोनी डोंगरे यासह पालक,संस्कृत शिक्षक,वाचक वर्ग उपस्थित होता.